Inside Story | महायुतीचा तिढा सुटता सुटेना, शिंदे, फडणवीस, अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार

महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीत नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते. या तीनही नेत्यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. पण या बैठकीत हवा तसा जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत आता पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Inside Story | महायुतीचा तिढा सुटता सुटेना, शिंदे, फडणवीस, अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 5:11 PM

मुंबई | 9 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत येत्या 11 मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. महायुतीच्या दिल्लीतील कालच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. तीन ते चार जागांचा तिढा कायम आहे. रामटेक, वाशिम-यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागेवर तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रामटेक, वाशिम, मावळ आणि कोल्हापूरच्या जागेवर सध्या चर्चा सुरु आहे. आगामी बैठकीत या जागांवरील तिढा सोडवण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. अमित शाह यांच्यासोबत काल शिंदे, फडणीस, अजित पवार यांच्यात तब्बल 2 तास खलबतं झाली. पण काल झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. 3 ते 4 जागांवर तिढा कायम आहे. रामटेक, वाशिम-यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागेवर अद्यापही तिढा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये पुन्हा 11 मार्चला बैठक होईल. या बैठकीला शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

’80 टक्क्यांपर्यंत काम झालंय, फडणवीसांची माहिती’

दिल्लीच्या कालच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील, अशी परिस्थिती नाहीय. पण मी हे म्हणू शकतो की, आमचं काम 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेलं आहे. 20 टक्क्याचं काम राहीलं आहे. आमच्यात चर्चा सुरु आहे. याबाबत फोनवर संभाषण झालं तरी चर्चा होते. आमच्यात आपापसात सध्या चर्चा सुरु आहे. आमचे जे काही थोडेफार विषय राहीले आहेत त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महायुतीत सध्या किती जागांचा फॉर्म्युला ठरला?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत 35 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. महायुतीच्या आतापर्यंत झालेल्या जागावाटपानुसार, अजित पवार गटाला 4 तर शिंदे गटाला 10 जागा मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कदाचित 11 तारखेच्या बैठकीनंतर येत्या 12 मार्चला याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.