सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार-खासदारांसह ‘या’ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर आज त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार-खासदारांसह 'या' तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 5:10 PM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे आमदार-खासदार देखील अयोध्येत जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार-खासदार अयोध्येत जावून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच आपल्या आमदार-खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

एकनाथ शिंदे एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी गेल्या आठवड्यात समोर आलेली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलेला. अयोध्येतील महंतांनी निमंत्रण दिलेलं आहे. त्या आमंत्रणाचा मान ठेवून आपण जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे याचा हा दौरा महत्त्वाचा आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“खरं म्हणजे अयोध्या हे आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच अयोध्येला जाऊ”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेल्या त्याचदिवशी शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के, भाऊ चौधरी, सुशांत शेलार अयोध्येत गेले होते. या तीनही नेत्यांकडून संध्याकाळी शरयू नदीवर आरती करण्यात आलेली.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाने याआधी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं

महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यावेळी एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामाला गेले होते. त्यावेळी सर्व आमदारांनी गुवाहाटी येथील प्रसिद्ध असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिलेली. सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलेलं. तसेच नवं सरकार स्थापन झाल्यास आपण पुन्हा दर्शनासाठी येऊ, असा नवस त्यांनी केलेला. त्यानुसार महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी पुन्हा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलेलं.

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी शिवसेनेकडून अयोध्येतही शक्तिप्रदर्शन करण्यात आलेलं. पण या दौऱ्याला शिवसेनेच्या अनेक आमदार-खासदारांना जाता आलं नव्हतं. विशेष म्हणजे काही आमदारांना तर विमानतळावरुन परत घरी जावं लागलं होतं, अशी चर्चा मध्यंतरी रंगलेली. त्यामुळे एकनाथ शिंदे यावेळी सर्व आमदार-खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. सर्वच आमदार एकसमान आहेत, असा संदेश शिंदे यांना आपल्या नेत्यांना यातून द्यायचा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.