BIG BREAKING : अखेर जतमधील 40 गावं ‘सुजलाम सुफलाम’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा
कर्नाटक सरकारने जतमध्ये पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय.
सांगली : कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारने पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचलं आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील काही भागांवर दावा केलाय. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारने जतमध्ये पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. जतमधील पाणी प्रश्न सोडण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय.
जतमधील पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जतमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जानेवारी महिन्यात 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दिलीय.
“रात्री दीड वाजता जतमधील लोकं आली होती. साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास आले. मी रात्री दीड वाजता पोहोचलो. त्यांनी देखील नकाशावर काही गोष्टी सांगितल्या. आम्ही त्यांच्यासाठी 2 हजार कोटींचं टेंडर काढतोय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचं काम करतोय. जतमधील जे 40-50 गावं आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी सर्व सुरुय. या विषयावर बाकीचे लोकं राजकारण करत असतील तर त्याला करु द्या. त्यांच्या राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन एवढंच मी सांगतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.