मोठी बातमी! मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

"मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल आहेत ते पडताळणी नुसार मागे घेण्यात येत आहेत. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन, सभा, रॅली काढल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत. रस्ता रोकोवरुन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची पहिल्या टप्प्यात स्क्रुटीनाईज सुरु आहे", अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मोठी बातमी! मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 6:00 PM

मुंबई | 18 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. “मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल आहेत ते पडताळणी नुसार मागे घेण्यात येत आहेत. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन, सभा, रॅली काढल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत. रस्ता रोकोवरुन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची पहिल्या टप्प्यात स्क्रुटीनाईज सुरु आहे. सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच घेतलेला आहे. त्यामुळे त्याची छाननी सुरु आहेत, ज्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी नाही त्यांचं वर्गीरकरण केलं जाईल. जे गंभीर गुन्हे आहेत, ज्यात जीवितहानी, वित्तहानी आहे, मालमत्तेचं नुकसान झालं आहे, त्यांना दुसऱ्या क्रायटेरियात बसवून सकारात्मक मार्ग काढणार आहोत. छोटे गुन्हे काढण्याचा सरकार अगोदर घेतला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

“आपण मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वात समिती नेमली. मराठा आरक्षण 10 टक्के देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण दिलं. या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला पाहिजे. आता पोलीस भरती सुरु आहे. त्यांना आरक्षणाचा फायदा होईल. कोर्टात काही लोकं गेली होती. पण कोर्टाने मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारची स्थगिती आणली नाही. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट फाईल करुन ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण दिलं आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘आम्ही खरंच डिलर आहोत’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल इंडिया आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला होता. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री डिलर आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. “जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले. उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले. त्यांना बोलायला फक्त पाच मिनिटे दिले. आम्ही छातीठोकपणे बोलत गेलो. आम्ही सत्तेसाठी भूमिका बदलणारे नाहीत. शिवसेनेला एकेकाळी शत्रू मांडणारे काँग्रेस ठाकरेंसोबत आहे. हे पॉलिटिकल क्रॉम्प्रमाईज होतं”, असं शिंदे म्हणाले. “आम्ही खरंच डिलर आहोत. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्येष्ठ, तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केले. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे आले. आता मोदींच्या काळात एकही घोटाळा आला नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य’

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामतीत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली. “विजय शिवतारे मला भेटले. मी त्यांना सांगितलं आपली महाराष्ट्रात युती आहे. युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य आहे. महायुतीत आमचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मदत करणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.