CM Uddhav Thackeray Live : 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार पण अटी शर्थी लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Aug 08, 2021 | 9:27 PM

CM Uddhav Thackeray Live : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

CM Uddhav Thackeray Live : 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार पण अटी शर्थी लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
15 ऑगस्टपासून सामान्य मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार पण अटी शर्थी लागू

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईल लोकलबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होणार आहे. मात्र त्यासाठी काही अटीशर्ती असणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेले असणं जरुरीचं आहे. तसेच दोन्ही डोस घेऊन 15 दिवस झालेले असणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री मुंबई लोकलबाबत नेमकं काय म्हणाले?

मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही मुद्दे :

स्वातंत्र्य दिनाचा संघर्ष फक्त आठवायचा नाही, आता निश्चय करुया : मुख्यमंत्री

सात दिवसांनी आपला स्वातंत्र्या दिन येतोय. ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर एक इतिहास वाचत असताना त्यावेळच्या पिढीने कसं झोकून देऊन संघर्ष केलं, त्या काळच्या फक्त आठवणी काढून उपयोग नाही. आपल्याला कोरोना संकट जाईल असं वाटलं होतं. कमी-जास्त प्रमाणात लाटा धडकत आहेत. किती लाटा येतील याचा अजूनही अंदाज नाही. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. तो संघर्ष फक्त आठवायचा नाही तर आपणही आता निश्चय केला पाहिजे की, प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच.

महापूर दरम्यान प्रशानाने चार लाख नागरिकांचं स्थलांतर केलं

ज्या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आपल्याला धडकलं. यावेळी तौत्के चक्रीवादळ आपल्या किनाऱ्याला स्पर्श केलं. त्याने करायचं तेवढं नुकसान केलंच. त्यानंतर जो काही पूर आला ते सगळं विचित्र होतं. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस एका दिवसात आणि काही तासात कोसळायला लागला. याची काही कारण आपण काहीह देऊ शकतो. वेध शाळेने याचा अपल्याला अंदाज दिला होता. पण तो इतक्या भीषण राहील असं कुणाला माहिती नव्हतं. काही ठिकाणी धरणाचं पाणी कमी करावं लागलं. त्यामुळे नद्यांना पूर आलं. आता हे दरवर्षाचं संकट त्यातून येणारी आपत्ती. त्यातल्या त्यात अतिवृष्टीचा इशारा सांगितल्यानंतर आपल्या प्रशासनाने जवळपास साजेचार लोकांचं स्थलांतर केलं. आपण जीवितहानी होऊ दिलं नाही. मात्र, ज्या दरडी कोसळल्या त्यात आपले रस्ते खचले. तसेच घाटही खचले. तसेच दरडी कोसळून गावचे गाव उद्धवस्त झाले. डोंगराच्या खाली आपले बांधव, मात-भगिनी गाडले गेले. दरडी कोसळणे, पूर येण्याचे प्रामाण लाढायला लागले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळणार आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल, असं म्हटलं जातंय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Aug 2021 08:31 PM (IST)

    ‘केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी’

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जावून भेट घेतली होती. त्यांना आपल्या राज्याच्या काही गोष्टींबाबत सहकार्य करण्याची विनंती केली होती. या आपत्तीच्या वेळेला एनडीआरएफचे निकष बदलायला हवेत. मदत वाढवायला हवी, अशी विनंती केली होती. तसेच आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली होती. मराठा आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण यासाठी एम्पेरिकल डेटा मागविला आहे. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षण. आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही केंद्रालाच आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षण द्यावं किंवा 50 टक्क्यांचे अट शिथिल करुन राज्यांना आरक्षणाचे अधिकार द्यावे, अशी विनंती केली होती. केंद्र सरकार आता राज्य सरकारला याबबतचा अधिकार देणार आहे. तसेच ५० टक्क्यांच्या अट शिथिल करुन द्यावी. आम्ही ज्यांवा आवश्यक आहे त्यांना आरक्षण देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबतची अट काढतील, असा मला विश्वास आहे.

  • 08 Aug 2021 08:23 PM (IST)

    महापूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत जाहीर केली

    मुख्यमंत्री आल्यानंतर एका पॅकेजची घोषणा करतात अशी परंपरा आहे. मी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पॅकेजची घोषणा करणार नाही पण सगळ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आजदेखील अनेक पालकमंत्री आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हजर आहेत. आम्ही एक आढावा घेतला की काय करता येईल? आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. तात्काळ मदत आणि लॉंगटर्म योजना करत आहोत. आपल्याला धोकादायक वस्त्यांचं पूनर्वसन करावं लागेल. तसेच पुराचं व्यवस्थापन करण्यासाठी दुरगामी योजना आखाव्या लागतील.

  • 08 Aug 2021 08:20 PM (IST)

    महापूर दरम्यान प्रशानाने चार लाख नागरिकांचं स्थलांतर केलं

    ज्या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आपल्याला धडकलं. यावेळी तौत्के चक्रीवादळ आपल्या किनाऱ्याला स्पर्श केलं. त्याने करायचं तेवढं नुकसान केलंच. त्यानंतर जो काही पूर आला ते सगळं विचित्र होतं. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस एका दिवसात आणि काही तासात कोसळायला लागला. याची काही कारण आपण काहीह देऊ शकतो. वेध शाळेने याचा अपल्याला अंदाज दिला होता. पण तो इतक्या भीषण राहील असं कुणाला माहिती नव्हतं. काही ठिकाणी धरणाचं पाणी कमी करावं लागलं. त्यामुळे नद्यांना पूर आलं. आता हे दरवर्षाचं संकट त्यातून येणारी आपत्ती. त्यातल्या त्यात अतिवृष्टीचा इशारा सांगितल्यानंतर आपल्या प्रशासनाने जवळपास साजेचार लोकांचं स्थलांतर केलं. आपण जीवितहानी होऊ दिलं नाही. मात्र, ज्या दरडी कोसळल्या त्यात आपले रस्ते खचले. तसेच घाटही खचले. तसेच दरडी कोसळून गावचे गाव उद्धवस्त झाले. डोंगराच्या खाली आपले बांधव, मात-भगिनी गाडले गेले. दरडी कोसळणे, पूर येण्याचे प्रामाण लाढायला लागले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळणार आणि त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल, असं म्हटलं जातंय.

  • 08 Aug 2021 08:13 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे : 

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे :

    ग्लोबल वार्मिंगमुळे पाण्याची पातळी वाढतेय

    ज्या वसाहती डोंगर भागात वसल्यात त्यांचा नव्यानं विचार करावा लागेल.

    अजूनही पालकमंत्री पुरग्रस्तांच्या मदतीला आहेत

    साडे अकरा हजार कोटींचा निधी पुरग्रस्तांना दिलाय

    अशा संकटाची ही काही पहिली वेळ नाही

    आता अहवालावर फक्त विचार होणार नाही तर कृती होणार

    पन्नास हजार नागरिक निवारा केंद्रात

    धोकादायक वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल

    चिपळूण, महाडमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल

    ओबीसी आरक्षणासाठी आम्ही इम्पेरिकल डाटा मागितलाय

    जोपर्यंत पन्नास टक्क्याची अट आरक्षणाची शिथिल होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही

  • 08 Aug 2021 08:10 PM (IST)

    स्वातंत्र्य दिनाचा संघर्ष फक्त आठवायचा नाही, आता निश्चय करुया : मुख्यमंत्री

    सात दिवसांनी आपला स्वातंत्र्या दिन येतोय. ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर एक इतिहास वाचत असताना त्यावेळच्या पिढीने कसं झोकून देऊन संघर्ष केलं, त्या काळच्या फक्त आठवणी काढून उपयोग नाही. आपल्याला कोरोना संकट जाईल असं वाटलं होतं. कमी-जास्त प्रमाणात लाटा धडकत आहेत. किती लाटा येतील याचा अजूनही अंदाज नाही. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. तो संघर्ष फक्त आठवायचा नाही तर आपणही आता निश्चय केला पाहिजे की, प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच.

  • 08 Aug 2021 08:03 PM (IST)

    ‘नीरज चोप्राचं अभिनंदन’

    मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे :

    बऱ्याच दिवसांनंतर आपल्याशी संवाद साधतोय. मधल्या काळात काय-काय घडलं आणि घडतंय हे आपण पाहिलं. एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, कोरोना संकट आणि दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिक सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. विशेषत: नीरज चोप्राचं अभिनंदन केलंच पाहिजे. कारण त्याने देशाची मान उंचावलं आहे. त्याने सुवर्ण पदक मिळावलं आहे. सगळेच खेळाडू मेहनत करत आहेत. खेळात हार-जीत होत असते. ते त्याच पद्धतीने घेतलं पाहिजे.

  • 08 Aug 2021 07:43 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 99 नवे कोरोनाबाधित, 102 जणांची कोरोनावर मात

    नाशिक कोरोना अपडेट :

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 102

    आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 99

    नाशिक मनपा- 042 नाशिक ग्रामीण- 050 मालेगाव मनपा- 001 जिल्हा बाह्य- 006

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8533

    आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 03 नाशिक मनपा- 02 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 01 जिल्हा बाह्य- 00

  • 08 Aug 2021 07:32 PM (IST)

    व्यापारी, हॉटेल चालक, लोकल प्रवाशांमध्ये नाराजी, मुख्यमंत्री काय आवाहन करणार?

    राज्यातील व्यापारी वर्गात मोठी नाराजी नाही. पुण्यातील व्यापाऱ्यांनी सरकारचे नियम धुडकावून लावत दुकानं संध्याकाळपर्यंत सुरु ठेवली आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या मालकांनीही नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी अजून तरी हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पूर्ण मुभा देणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. दुसरीकडे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी यासाठी भाजप, मनसे या विरोधी पक्षांसह सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे

Published On - Aug 08,2021 7:30 PM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.