मुंबई: गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (CM Uddhav Thackeray will address the state at 8.30 pm today)
राज्यात लॉकडाऊनची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यात अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
आधी आढावा, मग संवाद
दरम्यान, आज दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर कोरोना आढावा बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी संपूर्ण राज्यातील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे, अशा जिल्ह्यांचाही आढावा घेतला जाणार असून त्या जिल्ह्यांसाठी काही विशेष उपाय योजना करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लॉकडाऊनला विरोध, मग काय पर्याय?
राज्यात लॉकडाऊन करावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र भाजपच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन होणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, काँग्रेस नेते संजय निरुपम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी नागरिकांना पॅकेज देण्याची मागणी भाजपने केली आहे. (CM Uddhav Thackeray will address the state at 8.30 pm today)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 2 April 2021https://t.co/ZslvKFsxgI
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2021
संबंधित बातम्या:
Headline | 1 PM | राज्यात कोरोना रुग्णांचा प्रकोप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्बंध लावणार?
बचेंगे तो और भी लढेंगे, मुंबईच्या महापौरांनी मूठ आवळली, लॉकडाऊन की निर्बंध लवकरच घोषणा
राज्यात अंशत: लॉकडाऊन शक्य, ठाकरे सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांचा इशारा, नियमही सांगितले!
(CM Uddhav Thackeray will address the state at 8.30 pm today)