मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर, कृष्णा-वारणेच्या पुरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्या सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्या सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं. कोयना धरणातून विसर्ग करण्यात येत असल्यानं सांगलीत अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा कसा असेल?
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
सकाळी 9.50 वा. मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.
सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.
सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.
सकाळी 11.55 वा. कसबे डिग्रज येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद.
दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.
प्राथमिक अंदाजानुसार 40 हजार हेक्टर शेती बाधित
27 जुलै रोजी अखेर प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा काठी असणारया शिराळा, वाळवा ,पलूस आणि मिरज तालुक्यातील सुमारे 247 गावातील 97 हजार 485 शेतकरयांची 40 हजार हेक्टरहुन अधिक शेती बाधित झाली आहे. यामध्ये मुख्यतः ऊस, सोयाबीन,भुईमूग या पिकांच्या बरोबर भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
50 कोटींच्या आसपास नुकसान
जवळपास पन्नास कोटी इतका नुकसानीची आकडा असल्याचे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, अद्याप अनेक गावात पुराचे पाणी आहे. अनेक गावात पंचनामे सुरूच आहेत.पूर ओसरल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून 2019 मधील महापुराच्या पेक्षा यावेळी शेतीचे क्षेत्र अधिक बाधित झाल्याचे कृषी अधीक्षक बस्वराज मास्तोळी यांनी सांगितले आहे.
मिरज तालुक्यातील मौजे डिग्रजला ही पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला होता. त्यामुळे गावात घराच्या वर पाणी गेले होते. तर त्यामुळे येथील शेती पूर्णतः हा पाण्याखाली गेली होती.तर काही ठिकाणी ऊस शेती अक्षरश: जमीनदोस्त झाली आहे.
इतर बातम्या:
कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना
राज्य सरकारचा कारभार खोट बोल पण रेटून बोल, MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा
Maharashtra CM Uddhav Thackeray will visit live updates sangli flood affected area due flood of Krishna and Warana Maharahstra Rains