मुंबई: राज्यातील कोरोनाचं वाढतं संकट आणि लसीकरणावर येणारा खर्च या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. मीही एक वर्षाचं मानधन देणार आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, तशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच आमच्या अमृत उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. (Maharashtra Congress MLAs to donate one-month salary to CM’s Relief Fund)
बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. सर्वांचे मोफत लसीकरण झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झालं आहे. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. तसेच महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निेधीला पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं सांगतानाच सीएम रिलीफ फंडाला निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन थोरात यांनी केलं.
इतरांचा खर्च उचला
जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी पाच लोकांच्या लसीकरणाचा भार उचलावा, असं अभियान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांनी सुरू केलं आहे. ते स्वत: त्यांच्या आणि इतर पाच जणांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार आहेत. हा स्तुत्य उपक्रम असून सर्वांना प्रतिक पाटील यांचं अनुकरण करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
कर्मचाऱ्यांचा खर्च उचलणार
आमच्या अमृत उद्योगात एकूण पाच हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या लसीकरणाचा खर्चही आम्ही उचलणार असून हा पैसा सीएम रिलीफ फंडात देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
24 तासात 895 कोरोना बळी
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 66358 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच 67752 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या एकूण 672434 सक्रीय रुग्ण असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.21 टक्के आहे. (Maharashtra Congress MLAs to donate one-month salary to CM’s Relief Fund)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 29 April 2021 https://t.co/9r9Gxkx25A #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2021
संबंधित बातम्या:
कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा; संजय राऊत यांची मागणी
राज्यात कोरोना मृत्यूचं थैमान, पुणे महापालिकेत सर्वाधिक मृत्यू, गेल्या 5 दिवसातील आकडेवारी काय?
(Maharashtra Congress MLAs to donate one-month salary to CM’s Relief Fund)