AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांनी नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

लोकांनी नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही,असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. Maharashtra Corona Rajesh Tope Uddhav Thackeray

लोकांनी नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 4:22 PM

मुंबई: महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. लोकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. (Maharashtra Corona update health minister Rajesh Tope said people if not follow rule no option for lockdown after meeting with CM Uddhav Thackeray)

आपण लॉकडाऊनच्या दिशेने

महाराष्ट्रात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणं म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

आढावा बैठका सुरु राहणार

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज वाढत आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात बैठ दुपारी 12.30 वाजल्यापासून ते 1.30 पर्यंत बैठक झाली झाली. दररोज 10 टक्के प्रति दिवस रूग्णसंख्येत वाढ होतेय. दोन -तीन दिवस आणखी आढावा घेतला जाणार आहे.

राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, अजित पवारांचे बारामतीमध्ये वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेला आवाहन करुनही प्रतिसाद मिळत नसेल तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य पवार यांनी केले. आपापली जबाबदारी लक्षात घेवून नियमांचे उल्लंघन न करता होळी साजरी करा.सध्याची परिस्थिती पाहता शांतपणे होळी साजरी करा. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे. सध्या कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित आढळत आहेत ही चिंतेची बाब आहे. प्रत्येकानं नियमांचे पालन केलं पाहिजे. प्रशासन प्रयत्न करतंय, त्यामध्ये जनतेनेही मनावर घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी केली.

संबंधित बातम्या: 

होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध: भातखळकर

Corona Cases and Lockdown News LIVE : खासदार सुप्रिया सुळे यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय

(Maharashtra Corona update health minister Rajesh Tope said people if not follow rule no option for lockdown after meeting with CM Uddhav Thackeray)

पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त.