राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चैनच्या तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध, नेमकी कारणं काय?

Maharashtra Restrictions: कोरोना संक्रमणाचा दर अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चैनचे तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत.

राज्यातील 'या' 11 जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चैनच्या तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध, नेमकी कारणं काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 7:33 PM

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 6 ते 7 हजार रुग्ण आढळत आहेत. ही स्थिती राज्याची चिंता वाढवणारी आहे. कोरोना संक्रमणाचा दर अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ब्रेक द चैनचे तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत.पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम असतील.

राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अधिक रुग्ण

महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं, सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

कारणे

या अकरा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण अधिक आहेत. कोरोना संक्रमणाचा दर अधिक आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगरमध्ये नव्या केसेस मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे या अकरा जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लावण्याचा निर्णय झाला आहे.

रविवारी राज्यात किती रुग्ण आढळले?

महाराष्ट्रात रविवारी 6479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 157 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. रविवारी 4110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना मुक्त होण्याचा दर 96.59 वर पोहोचला आहे.

त्या अकरा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण किती?

पुणे (15680), सातारा (8153), सांगली, (7546) कोल्हापूर (5970), अहमदनगर (6610), सोलापूर (4936), रायगड (2830), रत्नागिरी (2249), सिंधुदुर्ग(1986), बीड (1831), पालघर (1115) सक्रिय रुग्ण आहेत.

लेव्हल 3 चे नियम

१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

२. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

३. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.

४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार 50% बैठक क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी 4 वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.

५. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..

६. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.

७. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.

८. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) 50% क्षमतेने सुरू राहतील.

९. क्रीडा- सकाळी 5 वा.पासून सकाळी 9 वा./ सायं 6 वा. पासून सायं.9 पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.

१०. चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. ११ . सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक 50% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

१२. लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येतील.

१३. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.

१४. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.

१५. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.

१६. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.

१७. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.

१८. जमावबंदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.

१९. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.

२०. सार्वजनिक परिवहन सेवा 100% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.

२१ . मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे 3 ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.

२२. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.

२३. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.

२४. उत्पादनाच्या अनुषंगाने :

१. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)

२. सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)

३. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन

४. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

इतर बातम्या:

Maharashtra Unlock : कोरोना निर्बंधांबाबत राज्य सरकारची नवी नियमावली, काय सुरु काय बंद राहणार? वाचा सविस्तर

Corona Update | दुकानं 8 वाजेपर्यत खुली ठेवण्याची परवानगी द्या, व्यापाऱ्यांची मागणी

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.