हालचाली वाढल्या, अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला, मुंबईत मोठ्या घडामोडी

Ajit Pawar meets Nawab Malik | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक नुकतंच जेलमधून बाहेर आले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केलाय. मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर आता अजित पवार त्यांच्या भे्टीला गेले.

हालचाली वाढल्या, अजित पवार नवाब मलिक यांच्या भेटीला, मुंबईत मोठ्या घडामोडी
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 8:00 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या भेटीला गेले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आजच नवाब मलिक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार हे नवाब मलिक यांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार यांच्यासोबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील नवाब मलिक यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

नवाब मलिक हे गेल्या दीड वर्षांपासून जेलमध्ये होते. ते सध्या आजारी असल्याने त्यांना उपचारांसाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर झालाय. सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना जामीन मंजूर झालाय. जामीन मिळाल्यानंतर ते जेलमधून बाहेर आले आहेत. ते जेलमध्ये गेले त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता. पण आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ते काय भूमिका जाहीर करतात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटात जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिक यांच्या भेटीनंतर अनिल देशमुख काय म्हणाले?

दरम्यान, नवाब मलिक यांची भेट घेतल्यानंतर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “नवाब मलिक हे आमचे जुने सहकारी आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून एकत्र काम केलं आहे. त्यांची सुटका झाली म्हणून आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो. त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. दीड वर्षांपासून त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांचं वजन कमी झालंय. त्यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. बाकी काही राजकीय चर्चा केली नाही”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

“नवाब मलिक आताच बाहेर आले आहेत. ते सर्वांना भेटतात. बाहेरच्या लोकांनाही भेटतात. इतके दिवस घरच्यांपासून लांब होते. ते आता घरी आले आहेत. सध्या ते घरच्यांना भेटत आहेत. शेवटी सर्वात आधी फॅमिली मग नंतर राजकारण”, असंही ते यावेळी म्हणाले.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.