Maharashtra DGP Loudspeaker Policy : सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत अधिकाऱ्याची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता ?
सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या (Loudspeaker) वापराबाबत महाराष्ट्राचे डीजीपी आज सर्व पोलिस आयुक्त, आयजी आणि एसपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही त्यासमोर हनुमान चाळीसा लावणार अशी भूमिका घेतली.
मुंबई – सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या (Loudspeaker) वापराबाबत महाराष्ट्राचे डीजीपी आज सर्व पोलिस आयुक्त, आयजी आणि एसपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही त्यासमोर हनुमान चाळीसा लावणार अशी भूमिका घेतली. तेव्हापासून महाराष्ट्रातलं (Maharshtra) राजकारण अधिक तापलं आहे. घाटकोपरमध्ये दुसऱ्या दिवशी एका मिशिदीसमोर हनुमान चाळीसा लावण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेवरती टीका केली. राज ठाकरेंनी पाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीवरती जोरदार टीका केली. सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे हे कोणालाच कळेना असं देखील ते म्हणाले होते.
Maharashtra DGP to hold a meeting via video conference with all police commissioners, IGs and SPs today on the issue use of loudspeakers in public places.
— ANI (@ANI) April 19, 2022
पोलिसांचं बाराकाईने लक्ष
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर पोलिसांनी राज्यात करडी नजर ठेवली. विशेष म्हणजे जातीय तेढ निर्माण केली किंवा हिंसाचार होईल भडकावणे पोलिसांचं लक्ष आहे. रामनवमीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी मुंबईत अधिक लक्ष ठेवलं होत. मुंबई विविध ठिकाणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी विविध प्रकरणाता आत्तापर्यंत 61 जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी मानखुर्द परिसरात दोन प्रकरण झाली. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी 30 जणांना ताब्यात घेतले.
मानखुर्दमध्ये दोन गटात राडा
रामनवमीच्या दिवशी मानखुर्द परिसरात पीएमएमजी कॉलनीत दोन गटात राडा झाला. त्यावेळी तिथं दोघेजण जखमी झाले आहेत. आलेल्या जमावाने पंचवीस ते तीस वाचनांची तोडफोड केली. त्यावेळी पोलिसांनी दोन गटातील सात जणांना अटक केली होती. त्यानंतर तिथं पोलिसांचा रात्रभर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी एक गट श्री राम म्हणत निघाला असताना राडा झाला. दोन गटात वाद झाला होता. पोलिसांनी आत्तापर्यंत 31 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.