तिसरी घंटा पुन्हा वाजणार, नाट्यगृहे पुन्हा उघडण्याचा मुहूर्त ठरला, काय आहेत नियम?
चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत विविध घटकांकडून सातत्याने मागणी होत आहे. हे घटक असंघटित असून आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील आहेत.
मुंबई : कोव्हिड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशान्वये लागू केलेले विविध निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली सभागृहे आणि मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भात या क्षेत्रातील विविध संघटना आणि संस्थांकडून शासनाला विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार नियम पाळून नाट्यगृह पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
आर्थिक फटका
चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत विविध घटकांकडून सातत्याने मागणी होत आहे. हे घटक असंघटित असून आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील आहेत. कोव्हिड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी घातलेल्या निर्बंधांमुळे हे घटक मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांप्रमाणेच चित्रपट आणि नाटक वगळता बंदिस्त सभागृहे/ मोकळ्या जागेत होणाऱ्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथील करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने काही निर्णय घेतले आहेत.
कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून दिनांक 22 ऑक्टोबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासन मान्यता देत आहे.
सर्व संबंधितांनी बंदिस्त सभागृहे / मोकळ्या जागेत होणारे इतर कार्यक्रमांचे परिचालन, कोविड 19 संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्यात येईल. कोविड 19 विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील. हा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महसूल व वन विभाग ( मदत व पुनर्वसन प्रभाग ) यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
काय आहेत नियम
बंदिस्त सभागृह
1. सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची/आयोजकांची जबाबदारी असेल.
2. बंदिस्त सभागृहाच्या एकूण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये.
3. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फूट) आवश्यक राहिल.
4. बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.
5. बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.
6. आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करुन ते दिवसभर सुरु ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार/ आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅपवरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्यदृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शवलेली असणे आवश्यक राहील.
7. सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधनगृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखणे आणि प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. प्रशासन याशित सर्वांनी मास्क लावणे आवश्यक राहील
इतर बातम्या
यंदा शिवसेनेच्या मेळाव्यात ‘राम’दास कदम नाहीत, ऑडिओ क्लिपप्रकरण भोवलं?
मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’