मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे (Aditya Thackeray tested corona positive). आदित्य यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत (Aditya Thackeray tested corona positive).
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
मुख्यमंत्र्यांकडून काळजी घेण्याचं आवाहन
राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरु आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जनतेला काळजी घेण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे कोरोना काळात स्वत: मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व शहरांचा आढावा घ्यायचे आणि अधिकाऱ्यांना सूचना द्यायचे. मात्र, तरीही दुर्देवाने मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला.
आदित्य ठाकरे यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक लोकांना भेट दिली. अनेक विकास कामांचे उद्घाटन त्यांनी केले. याशिवाय सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली. मात्र, हे सर्व काम करत असताना ते कदाचित कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले असावेत त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.