मागेल त्याला सौर कृषी पंप, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस

Maharashtra budget 2024-25 | शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन सौर कृषीपंप बसविण्यात येतील, अशी माहिती अजित पवार यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना दिली.

मागेल त्याला सौर कृषी पंप, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 3:57 PM

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम बजेट आज विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी कृषी विभाग आणि शेतकऱ्यांसाठी काय-काय योजना आहेत, तसेच त्यासाठी किती खर्चाची तरतूद राज्याच्या तिजोरीतून करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. शिंदे सरकारचा यावर्षाचा बजेट हा शेवटचा आहे. त्यानंतर राज्यात पुढच्या सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे या अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय-काय घोषणा दिल्या जातात याकडे राज्याचं लक्ष होतं. अखेर अजित पवार यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केलं. यावेळी शेतकऱ्यांसाठी विविध विभागांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

“मुख्यमंत्री सौर रुची वाहिनी योजना 2 अंतर्गत 7 हजार मेगाव्हॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याची योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरु करण्यात येईल. या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन सौर कृषीपंप बसविण्यात येतील. पीएम कुसूम योजनेअंतर्गत यावर्षी 1 लाख कृषीपंप स्थापनेचे उद्दीष्ट असून त्यापैकी 78 हजार 757 पंप कार्यान्वित झालेले आहेत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

“खरिप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ 1245 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या 44 लाख 82 हजार शेतकऱ्यांना 3825 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै 2022 पासून 12769 कोटींची मदत देण्यात आलेली आहे. 2024-25 वर्षासाठी मदत-पुनर्वसन विभागास 668 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव नियोजित आहेत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देणार

“राज्यात सर्व उपसा योजनांचं सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील 2 वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्यासाठी वीजदर सवलतीस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल. वीजसेवा नसलेल्या राज्यातील 37 हजार अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे”, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

“सर्व पर्यावरण स्नेही सौरऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदुषणात घट होईल. तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल. 2024-25 वर्षात खर्चाकरता ऊर्जा विभागाला 11,934 कोटींचा नियत्वे प्रस्तावित आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ‘इतक्या’ कोटींचं अनुदान

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोठी 1691 कोटी 47 लाख अनुदान प्रदान करण्यात आलेलं आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपया पीकविमा योजनेतून 50 लाथ 1 हजार शेतकरी अर्जदारांना 2268 कोटी 43 लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6000 कोटी रुपये किंमतीच्या पहिल्या टप्प्यात मान्यता देण्यात आलेली आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

कृषी महाविद्यालयाला मंजुरी

“वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे झिरवाडी तालुका, परळी, वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन आणि प्रक्रिया उपकेंद्र, शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

“राष्ट्रीय पशूधन अभियाना अंतर्गत शेळी, मेंढी, वराट, कुक्कुट आणि वैरण विषयक योजनांचा लाभ शेतकरी आणि पशू पालकांना मिळावा यासाठी 129 प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यास आला आहे. 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी कृषी विभागास 3650 कोटी, पशू संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स संवर्धन विभागास 555 कोटी, फलोत्पादन विभागास 708 कोटींचा प्रस्तावित आहे”, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.