Eknath Shinde: बहुमत चाचणीवेळी कॉंग्रेसचे 10 आमदार गैरहजर; बंडखोरांनी दुसरी लढाईही जिंकली; अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदेंही गैरहजर

या राजकीय नाट्यात बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने यावेळीही बाजी मारत पुन्हा एकदा फडणवीसांच्या राजकारणाचे गडद चित्र दिसले. यावेळीही शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारत आपला गट मजबूज ठेवला आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे.

Eknath Shinde: बहुमत चाचणीवेळी कॉंग्रेसचे 10 आमदार गैरहजर; बंडखोरांनी दुसरी लढाईही जिंकली; अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदेंही गैरहजर
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 3:21 PM

मुंबईः शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी (Rebel MLA) केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या नाराजी नाट्याचा शेवटचा अंक काय असेल याची कोणालाचा कल्पना नव्हती मात्र आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवून त्या नाराजी नाट्याचा शेवट झाला. त्यानंतर विधासभा अध्यक्ष पदाची निवडही रंगतदार राजकारणांनी झाली. राज्यात राजकीय घडामोडी घडत असतानाच आज एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं बहुमताची चाचणी (Majority test) मोठ्या फरकाने जिंकत बंडखोर गटाने दुसरीही लढाई जिंकली आहे. काल विधानसभा (Vidhansabha) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काही सदस्य गैरहजर होते, त्याचप्रमाणे आजदेखील काही सदस्य गैरहजर राहिले. काही सदस्य उशीरा पोहोचल्याने त्यांना सभागृहात एन्ट्री मिळाली नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. या प्रक्रियेदरम्यान एकूण 22 आमदार गैरहजर राहिले.

कॉंग्रेसचे 10 आमदार गैरहजर

यामध्ये जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे. तर अण्णा बनसोडे, संग्राम जगताप, मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, नवाब मलिक, अनिल देशमुख, मुफ्ती इस्माईल, निलेश लंके, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते, माधवराव जवळगावकर

राजकारण देवेंद्र फडणवीसांचे

या राजकीय नाट्यात बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने यावेळीही बाजी मारत पुन्हा एकदा फडणवीसांच्या राजकारणाचे गडद चित्र दिसले. यावेळीही शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारत आपला गट मजबूज ठेवला आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे.

आज खरी कसोटी

काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला आहे. त्यानंतर आज त्यांची खरी कसोटी सिद्ध करण्याची वेळ होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यावेळी शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली, तर या प्रस्तावाच्या विरोधात 99 मतं पडली आहेत.

बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही

रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावा विरोधात 107 मते पडली होती. आज बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आजच्या प्रस्तावाच्या वेळी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे तीन आमदार तटस्थ राहिले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.