इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं – जयंत पाटील

इंडिया आघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी सर्वच नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, संघर्षाला आता तर सुरुवात झाली आहे. लढाई अजून बाकी आहे.

इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं - जयंत पाटील
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 3:00 PM

लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर महाविकासआघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. ते म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहोत. सर्वच मित्र पक्षांनी मेहनत घेतली. विविध संघटनांनीही मोठी कामगिरी बजावली. जनजागरण केलं. निर्भय बनो ही संघटना आहे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांनी चांगलं काम केलं. महाराष्ट्रात जनजागरण केलं. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे. देशातील राजकारणात महाराष्ट्राने वठवलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला जे बळ जनतेने दिलं, त्यात सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिलं आहे.’

महाराष्ट्राने लोकशाही वाचवली – चव्हाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी  ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आघाडीला निर्णायक बहुमत दिलं आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. यात ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केलं. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे.’

लढाई आता सुरु झालीये – ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, हा विजय अंतिम नाही. ही लढाई आता सुरु झाली आहे. इतर निवडणुकाही आता येतील. मोदी सरकार आता एनडीए सरकार झाले आहे. हे सरकार किती दिवस टिकणार हे माहित नाही. जनतेची जनता या निवडणुकीत जागी झाली.

देशाच्या पंतप्रधानांच्या विधानसभेच्या निवडणुकीत जेवढ्या सभा होतील. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.