तळीरामांसाठी झिंगाट निर्णय, रातभर बसा अन् सकाळी…, दारुची दुकानं आणि बार इतक्या वाजेपर्यंत सुरु राहणार

राज्य सरकारने मद्यप्रेमींना खूश करणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी, तसेच ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट दिली आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे.

तळीरामांसाठी झिंगाट निर्णय, रातभर बसा अन् सकाळी..., दारुची दुकानं आणि बार इतक्या वाजेपर्यंत सुरु राहणार
liquor
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 9:36 PM

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 21 डिसेंबर 2023 : राज्यभरात सध्या नव्या वर्षाच्या आगमनाचा उत्साह आहे. अनेक खासगी कार्यालयांमध्ये ख्रिसमस सुट्टी लागायच्या आधीच ख्रिसमस डे साजरा केला जातोय. काही कार्यालयांमध्ये सिक्रेट सान्टा हा गंमतीशीर खेळ ख्रिसमसच्या आधीच खेळला जात आहे. कारण ख्रिसमसच्या दिवशी आणि या सणाच्या सुट्टीच्या निमित्ताने अनेकजण फिरायला जाणार आहेत. त्यामुळे आताच सणाचा उत्साह सर्वत्र पसरलेला आहे. असं असताना राज्य सरकारने मद्यप्रेमींना खूश करणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी, तसेच ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट दिली आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 139 (1) (C) आणि कलम 143) (2) (H) (4) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारं किरकोळ विक्रीचं दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -2 अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-2 प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे.

बीअर बार आणि क्लबसाठी पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा

बीअर बारला रात्री 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. विशेष म्हणजे क्लबला देखील रात्री मुभा असेल. क्लबसाठी पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

दारुच्या ‘या’ दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मुभा

विदेशी मध्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान खुलं ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळाळेल्या दारुच्या दुकानांना रात्री साडे अकरा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान खुलं ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एफएलडब्ल्यू-2 प्रकारच्या मद्यविक्रेत्यांसाठी रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

‘या’ दुकांनाना पहाटे 5 वाजेपर्यंत सूट

एफएलबीआर-2 प्रकारच्या मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना रात्री साडेदहा ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा असणार आहे. तर एफएल-3 (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.