मोठी बातमी! विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, सूत्रांची माहिती

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने येत्या 20 आणि 21 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती समोर आली आहे. या अधिवेशनात मराठा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणाबाबत कायदा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोठी बातमी! विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, सूत्रांची माहिती
maratha reservationImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 7:46 PM

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 20 आणि 21 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी फडणवीस सरकारकडून एसीबीसीचं आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं होतं. त्याच्या तरतुदी या अधिवेशनात केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन कधी बोलवणार? असा सवाल केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशानत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव सादर होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मनात आलं म्हणजे विधीमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. “मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार आहे”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. “जरांगेंवर नाराजी नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी”, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की, मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेल. 20 तारखेला अधिवेशन आहे. त्यांच्या अधिकृत सीएमओच्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. आम्ही उद्या आरक्षण घेणार आहोत, असं म्हणून विधीमंडळाचं अधिवेशन होत नाही. मला मनोज जरांगे यांना आजही विनंती करायची आहे की, स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. सामंजसपणाने भूमिका घेतली पाहिजे. उपोषणामुळे चिडचिड होत असेल. पण त्यांच्या कुठल्या वक्तव्यामुळे आम्ही नाराज आहोत, असं नाही”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

‘जरांगेंच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर कृत्य महाराष्ट्राचं सरकार करतंय’

ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर कृत्य हे महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे सरकार करत आहे. मागच्यावेळी त्यांना फसवलं”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.