Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; राज्यात आज सार्वजनिक सुट्टी

आपल्या दैवी आवाजाने तब्बल चार पिढ्यांवर गारुड निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने 7 फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; राज्यात आज सार्वजनिक सुट्टी
Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 6:59 AM

मुंबई: आपल्या दैवी आवाजाने तब्बल चार पिढ्यांवर गारुड निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे राज्य सरकारने (maharashtra government) दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने आज  (7 फेब्रुवारी) रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील (mantralaya) तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच लतादीदींच्या पार्थिवावर थोड्याच वेळात शिवाजी पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचत आहेत.

लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या तब्बल 28 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. काल त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत नव्हत्या. अखेर आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात  आली आहे.

फ्रान्सच्या संसदेवरही झेंडा अर्ध्यावर

फ्रान्स सरकारनेही लता दीदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवलं होतं. लतादीदींच्या निधनानंतर फ्रान्स सरकारनेही आपला झेंडा अर्ध्यावर उतरवला आहे. तसेच फ्रान्स सरकारनेही लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

Lata Mangeshkar : मुंबईतील या मार्गाने निघणार लतादिदींची अंत्ययात्रा, पंतप्रधान मोदी मुंबईत येणार

Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

Lata Mangeshkar Passed Away : लतादिदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला रवाना, छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात पोलिसांचा फौजफाटा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.