Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; वाचा, संपूर्ण नियमावली, काय सुरु, काय बंद?

शुक्रवार संध्याकाळी 6 पासून- सोमवार सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असेल. तर राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. (Maharashtra Weekend Lockdown Guidelines)

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; वाचा, संपूर्ण नियमावली, काय सुरु, काय बंद?
लॉकडाऊन प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 10:56 AM

मुंबई : महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल)  वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Government declared new weekend lockdown rules guidelines)

आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्टला परवानगी

ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल त्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या . तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आलीय. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहेय

वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?

सुपरमार्केट, डी-मार्ट, बिग बाझार, रिलायन्स उघडे राहणार का ? कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 4 आणि 5 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरु राहणार आहे. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते बंद राहतील.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील काय बंद राहणार ?

अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.

एपीएमसी मार्केट विकेंड लॉकडाऊनध्ये सुरु राहणार का ?

होय.कोरोना नियमांचं पालन करत मार्केट सुरु राहणार, स्थानिक प्रशासनाला वाटलं की नियमांचं उल्लंघन होत आहे.तर, ते राज्य सरकारकडून परवानगी घेवून मार्केट बंद करु शकतात.

बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने सुरु राहतील का ?

नाही

गॅरेज सर्विस,ट्रानस्पोर्ट वाहन दुरुस्ती सेवा सुरु राहणार? वाहनांचे स्पेअर पार्ट पुरवणारी दुकानं सुरु राहणार?

गॅरेज सुरु राहतील, स्थानिक प्रशासनानं तिथे कोरोना नियमांचं पालन केलं जातेय का ते पाहावे. ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील.

केंद्र सरकार, पब्लिक सेक्टरमधील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात का?

केंद सरकारच्या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून समजले जाणार नाहीत. मात्र, ज्या सेवा अत्यावश्यक सेवेत गणल्या जातात त्यांना यातून सूट असेल.

नागरिक दारु विकत घेऊ शकतात का?

4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करु शकतात. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल. उत्पादन शुल्क विभागाचे नियम पाळावे लागतीतल.

दारुची दुकानं खुली असणार का?

नाही

रस्त्याशेजारील ढाबे खुले असणार का?

ढाबे सुरु असतील मात्र, तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.

इलेक्ट्रिक उपकरणाची दुकानं सुरु राहणार का?

एसी. कुलर, फ्रीज दुरुस्ती दुकानं सुरु नसतील. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरची दुकानं बंद असतील.

सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असतील. रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरु असतील.

संबंधित बातम्या:

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend Lockdown | सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

(Maharashtra Government declared new weekend lockdown rules guidelines)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.