शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची हाक ऐकली, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना दुप्पट मदत मिळणार
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने आज महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली होती. पण आता शिंदे-फडणवीस सरकारने त्या मदतीची रक्कम दुप्पट केलीय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाने आज महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
महसूल आणि वन विभागाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे. शेतकऱ्यांना आता 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात आतापर्यंत जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 6 हजार 800 रुपये प्रती हेक्टर मदत मिळत होती. पण आता हीच मदत 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर इतकी मिळणार आहे.
दुसरीकडे बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 प्रती हेक्टर मदत आतापर्यंत दिली जात होती. पण यापुढे हीच मदत 27 हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत.
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार प्रती हेक्टर मदत दिली जात आहोत. पण आता यापुढे ही मदत 36 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत नव्याने उभं राहण्यासाठी नक्कीच काहीतरी हातभार लागणारआहे.