लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; दरेकर यांची ठाकरे, दानवेंकडे मागणी

ज्यांनी कोरोना लसीचे दोन लस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (maharashtra government)

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; दरेकर यांची ठाकरे, दानवेंकडे मागणी
pravin darekar
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 3:44 PM

मुंबई: ज्यांनी कोरोना लसीचे दोन लस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्यामुळे कोव्हिडची लस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (maharashtra government should give permission to travel from local for those who get double dose)

प्रवीण दरेकर यांनी आज सकाळी हे पत्रं लिहून मागणी केली आहे. मुंबईचा पॉझिटीव्हिटी दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी तातडीने लोकल सुरू करावी. कल्याण-डोंबिवलीहून खाजगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागतात, त्यामुळे चाकरमान्यांचे हित लक्षात घेत कोव्हिडच्या लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या चाकरमान्यांना लोकल प्रवासाची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

सामान्यांचे जगणे मुश्किल

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरीता जलद गतीने लसीकरण करण्यास भर दिला गेला. परंतु, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये शहरांमधील निर्बंध कमी करण्यात आले. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या प्रवासासाठी रेल्वे, मेट्रो, ट्राम इत्यादी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. वाहतुकीची ही साधने या शहरांसाठी व तेथील नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहेत, तशीच मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. कोरोनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नोकरी- व्यवसायाला जाणे अवघड झाले आहे, परिणामी जीवन कसे जगायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, अशी खंत दरेकर यांनी पत्राव्दारे व्यक्त केली.

कल्याणकर हैराण

कल्याण परिसरातून उपजिविकेसाठी मुंबईला दरदिवशी प्रवास करणारे लाखो नागरिक आहेत. उपनगरीय लोकल सेवा सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांसाठी बंद असल्यामुळे त्या नागरिकांना रस्ते मार्गाने कामावर जाण्या-येण्यास सुमारे 4 ते 5 तास प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे कल्याणकर हैराण झाले आहेत. कोरोना संकटामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आर्थिक परिस्थिती कोलमोडली आहे, असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणुन दिले.

खासगी कर्मचाऱ्यांना मुभा द्या

कर्जत, कसाऱ्यापासून ते सीएसटीपर्यंत तसेच डहाणू पासून ते चर्चगेट पर्यंत आणि पनवेल पासून ते सीएसटीपर्यंत ज्या नागरिकांचे लसीचे दोन डोस झाले आहेत, अशा सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची अनुमती आहे, त्याचप्रमाणे ज्या खाजगी कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत, त्यांनाही लोकलमधून प्रवासाची अनुमती मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (maharashtra government should give permission to travel from local for those who get double dose)

संबंधित बातम्या:

कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा : संभाजी भिडे

पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनं शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, पाळत का ठेवली हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनीच सांगाव: फडणवीस

‘माझ्यात ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता, पण महाराष्ट्रीयन असल्याने कॅम्पबाहेर काढले’

(maharashtra government should give permission to travel from local for those who get double dose)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.