Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diesel Price: मोदींनी कान टोचल्यानंतर आघाडी सरकार डिझेलचे दर कमी करणार; उद्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव

Diesel Price: पेट्रोलनंतर आता डिझेलचे दर कमी करण्याचं राज्य सरकारमध्ये घटत आहे.

Diesel Price: मोदींनी कान टोचल्यानंतर आघाडी सरकार डिझेलचे दर कमी करणार; उद्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव
मोदींनी कान टोचल्यानंतर आघाडी सरकार डिझेलचे दर कमी करणार; उद्या कॅबिनेटमध्ये प्रस्तावImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 4:48 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीवरून राज्य सरकारांचे कान टोचल्यानंतर अखेर आघाडी (maha vikas aghadi) सरकार जागे झाले आहे. पेट्रोलनंतर आता डिझेलचे दर (Diesel Price) कमी करण्याचं राज्य सरकारमध्ये घटत आहे. एक रुपयाने हे दर कमी करण्यात येणार असून तसा प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उद्याच्या कॅबिनेट बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी गैरभाजपशासित राज्यांनी इंधनाचे दर कमी केले नसल्याचं सांगत वाढत्या महागाईला या राज्यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरलं होतं. तर केंद्राला राज्य सरकारचं सर्वात मोठं योगदान मिळत असूनही आर्थिकबाबतीत महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे इंधनाचे दर कमी होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच राज्य सरकार उद्या एक रुपयाने डिझेलचे भाव कमी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मोदी काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजप शासित राज्यांनी इंधन दर कमी केले. पण गैर भाजपशासित राज्य सरकारांनी इंधन दर कमी केले नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांनी इंधन दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना मोदींनी केल्या होत्या.

उद्धव ठाकरेंचा पलटवार

मोदींच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेसनोट करून केंद्र सरकार महाराष्ट्राशी सापत्नभावाने वागत असल्याचा आरोप केला. आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये 24 रुपये 38 पैसे केंद्राचा तर 22 रुपये37 पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात 31 रुपये 58 पैसे केंद्रीय कर तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही असेही मुख्यमंत्री म्हणतात. राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नैसर्गिक वायूच्या अनुषंगाने कर सवलती यापूर्वीच दिल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

भुजबळांची टीका

केंद्रसरकार वारंवार इंधनाचे दर वाढवत असून राज्यांना जीएसटीचा परतावा देत नाहीय. 25 रुपयांची वाढ करुन त्यानंतर दोन रुपयांची दर कपात करुन फार मोठी कपात केल्याचा आभास केंद्रसरकारकडून निर्माण केला जातोय, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला.किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला त्याबाबतही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी रक्तस्त्राव झालेला नाही असे मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटले आहे तर त्यांच्या तोंडावर रक्त आले कुठून ? दुसऱ्या दिवशी ते पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यावर बँडेच नव्हते, तिथे जखम नव्हती, हे कसे काय झाले? असे प्रश्न उपस्थित करुन किरीट सोमय्या यांच्या नौटंकीची पोलखोल केली.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.