मराठा आरक्षणासाठी बलिदान, 34 युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, संपूर्ण यादी एका क्लिकवर

| Updated on: Dec 01, 2021 | 8:04 AM

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे.

मराठा आरक्षणासाठी बलिदान, 34  युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत, संपूर्ण यादी एका क्लिकवर
मराठा आरक्षण आंदोलन
Follow us on

मुंबई: महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aaghadi Government) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली आहे. सतत पाठपुरावा केल्यानं मराठा समाजातील 34 युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याचं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ही मदत जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असून ती संबंधित कुटुबीयांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

सतत पाठपुरावा केल्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला.बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने 10 लक्ष रुपये मदत वितरित केली आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

राजेश टोपे यांचं ट्विट

अशोक चव्हाण यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत करण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. ती आमच्या सरकारच्या काळात पूर्ण करण्यात आलीय. एकूण 34 युवकांच्या कुटुबीयांना 10 लाख रुपयांची मदत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आली असून ती लवकरचं कुटुंबीयांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी 5 लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रूपये या निधीतून दिले जातील.

कोणत्या जिल्ह्यातील किती कुटुंबांना मदत मिळणार?

शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्या मागणीनुसार हा निधी निर्गमित केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

इतर बातम्या:

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये बैठक; कुठलीही राजकीय चर्चा नाही, आदित्य ठाकरेंची माहिती

Maharashtra Government transfer relief fund of 10 lakhs to 34 Maratha Reservation Martyr list tweet by Rajesh Tope