आता घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार ‘स्मार्ट’, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये स्मार्ट मीटर बसवणार
घरगुती वीज ग्राहकांच्या रिडिंगबाबतच्या तक्रारींवर कायमचा तोडगा काढण्यासाठी अखेर ऊर्जा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (maharashtra government will install smart meters in Mumbai and other major city)
मुंबई: घरगुती वीज ग्राहकांच्या रिडिंगबाबतच्या तक्रारींवर कायमचा तोडगा काढण्यासाठी अखेर ऊर्जा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. (maharashtra government will install smart meters in Mumbai and other major city)
ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी स्मार्ट मीटर योजनेबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक(वित्त) रविंद्र सावंत, महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही राऊत यांनी दिल्या.
सिम कार्डप्रमाणे स्मार्ट मीटरचा वापर
मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रि पेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल बिनचूक दिले जाईल. मीटरमध्ये छेडखानी करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. तसेच विजेचा काटकसरीने विवेकी वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल. स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पध्दतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येईल. याचा फायदा ग्रीडचे व्यवस्थापन स्मार्ट पध्दतीने करत येणे शक्य आहे. दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल ज्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. तसेच एखाद्या दूरस्थ पद्धतीने बसून मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परिक्षणासाठी घेतला जाऊ शकतो.
जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढवणार
अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करा, असे आदेशच राऊत यांनी प्रशासनाला दिले. गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीज जोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. (maharashtra government will install smart meters in Mumbai and other major city)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 July 2021 https://t.co/mZxOQFFwT6 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2021
संबंधित बातम्या:
Breaking: 40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
ठाण्यात छमछम बंद, 15 लेडीजबार सील; महापालिकेची मोठी कारवाई
(maharashtra government will install smart meters in Mumbai and other major city)