Bhagat Singh Koshyari’s letter to CM Uddhav Thackeray: तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांचं कडक शब्दात उत्तर, वाचा संपूर्ण पत्र जशास तसं

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीवर आक्षेप घेणारं पत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना तिखट भाषेत उत्तर देणारं पत्रं पाठवलं होतं.

Bhagat Singh Koshyari's letter to CM Uddhav Thackeray: तुमचं पत्रं अपमान आणि बदनामी करणारं, मुख्यमंत्र्यांच्या पत्राला राज्यपालांचं कडक शब्दात उत्तर, वाचा संपूर्ण पत्र जशास तसं
bhagat singh koshyari
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 1:37 PM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी विधानसभा अध्यक्षाच्या (Assembly Speaker Election) निवडीवर आक्षेप घेणारं पत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना तिखट भाषेत उत्तर देणारं पत्रं पाठवलं होतं. त्यावर राज्यपालांनी आपलं उत्तर मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील भाषेवरच नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्रं जसंच्या तसं.

राज्यपाल म्हणतात…

तुमच्या पत्रात तुम्ही संविधानाच्या अनुच्छेद 208 नुसार नियम तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण तुम्ही अर्धवट माहिती देत आहात. त्याच अनुच्छेदात म्हटलं आहे की, जो काही विधीमंडळाचा निर्णय घेतला जाईल. तो संविधानिक असला पाहिजे. संविधानिक प्रक्रिया पार पाडूनच त्याची कार्यपद्धती असली पाहिजे.

संविधानाच्या कलम 159 नुसार राज्य घटनेचं संरक्षण, संवर्धन आणि बचाव करण्याची मी शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भातील नियमात करण्यात आलेले बदल हे प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्यानं त्याला सद्यस्थितीत मंजुरी देता येणार नाही.

आपण सभापती निवडीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी 11 महिने घेतले आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेच्या नियम 6 आणि 7 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. या सर्वांचा प्रभाव आणि दुरुस्त्यांचे कायदेशीर परीक्षण करणे आवश्यक आहे. मी आतापर्यंत सभागृहाची कार्यपद्धती/ प्रक्रियेसंदर्भात कधीही प्रश्न विचारला नाही. तथापि, संविधानाच्या कलम 208 मध्ये नमूद केल्यानुसार, प्रथमदर्शनी असंवैधानिक आणि बेकायदेशीर वाटणाऱ्या या प्रक्रियेला संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.

bhagat singh koshyari's letter

bhagat singh koshyari’s letter

तुमच्या पत्राचा असंयमी टोन आणि धमकावणारा सूर पाहुण मी वैयक्तिकरीत्या खूप दु:खी झालो आहे. ते पत्र संविधानचं सर्वोच्च ऑफिस असलेल्या राज्यपालाचा अपमान आणि बदनामी करणारं आहे.

संबंधित बातम्या:

Police Recruitment | पोलीस दलात मेगाभरती, 50 हजार पदं भरणार, दिलीप वळसे पाटील यांची माहिती

पाकिस्तानचा मजनू, बॉर्डर पार करुन मुंबईत, लैला नेमकी कुठं गेली? सोशल मीडियावरची दिवानी लव्ह स्टोरी

समलैंगिक, अलैंगिक संबंध कोण सिद्ध करणार? जनावरे सर्टिफिकेट देणार काय?; सुधीर मुनगंटीवारांचा पारा चढला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.