Satara Gram Panchayat Election Results 2021: खासदार उदयनराजेंना धक्का; दत्तक गावात दारूण पराभव
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जबरदस्त धक्का बसला आहे. (shivendrasinh raje defeated udayanraje bhosale panel in gram panchayat election)
सातारा: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जबरदस्त धक्का बसला आहे. उदयनराजे यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने दणदणीत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. (shivendrasinh raje defeated udayanraje bhosale panel in gram panchayat election)
सातारा शहरा लगत असलेल्या कोंडवे हे गाव उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतले होते. कोंडवे ग्रामपंचायतीसाठी उदयनराजे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उदयनराजे गटाने खास रणनीती आखली होती. मात्र, त्यात ते अपयशी ठरले आहेत. या निवडणुकीत कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. तर आमदार शिवेंद्रसिंह राजे गटाला 10 जागांवर घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे उदयनराजेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
अंगापूर वंदनमध्ये सर्व जागांवर धुव्वा
सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन ग्रामपंचायत निवडणुकीत उदयनराजे भोसले गटाला मोठा धक्का बसला आहे. या ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 11 जागा उदयनराजे गटाला गमवाव्या लागल्या आहेत. आमदार शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंह राजे यांच्या गटाला या सर्वच्या सर्व 11 जागा मिळाल्या आहेत. अतीत ग्रामपंचायत निवडणुकीतही शिवेंद्रसिंह राजे गटाला 10 जागांवर विजय मिळाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (shivendrasinh raje defeated udayanraje bhosale panel in gram panchayat election)
#गुलालकुणाचा – रत्नागिरीत 360 ग्रामपंचायतींसाठी मतदान, आमदार भास्कर जाधव, योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला, दहा वाजता मतमोजणी सुरु होणार, ग्रामपंचायत निवडणुकांचा वेगवान निकाल, सर्वात आधी टीव्ही 9 मराठीवर https://t.co/atVRNYvTQS #GramPanchayatElectionResults pic.twitter.com/85zKJpmtgA
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या:
विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा
(shivendrasinh raje defeated udayanraje bhosale panel in gram panchayat election)