Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोना संकटाचा ‘पुनर्जन्म’? दिवसभरात तब्बल 14 रुग्ण, आरोग्य विभागात मोठ्या हालचाली

महाराष्ट्रात अचानकपणे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे दिवसभरात तब्बल 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता महाराष्ट्राचं आरोग्य विभाग प्रचंड कामाला लागलं आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सतर्क झालंय.

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोना संकटाचा 'पुनर्जन्म'? दिवसभरात तब्बल 14 रुग्ण, आरोग्य विभागात मोठ्या हालचाली
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 9:03 PM

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरानाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची माहिती समोर आली होती. या व्हेरिएंटमुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचीदेखील माहिती समोर आली. त्यानंतर आता कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकाच दिवशी तब्बल 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रासाठी खरंतर ही धोक्याची घंटा मानली जात आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतील 27, ठाण्यातील 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा सारखा वाढतोय. विशेष म्हणजे संपूर्ण देशभरात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. देशात सध्या 2311 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र शासन सतर्क झालं आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या दृष्टीने राज्य सरकारने तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारची नेमकी तयारी काय?

कोरनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील 17 डिसेंबरला विविध रुग्णालयांमध्ये तयारीच्या दृष्टीने मॉकड्रिल पार पडलं आहे. JN.1 हा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे या व्हेरीयंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापी कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटबाधित 1 रुग्ण

राज्यामध्ये आजपर्यंत एक JN.1 या व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण सिंधुदुर्ग येथील 41 वर्षाचा पुरूष आहे. सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या I.L.I आणि SARI रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड पूर्व तयारी करण्यात आलीय. त्यामध्ये सर्व जिल्हयामध्ये आरोग्य संस्थाचे मॉकड्रील 17 डिसेंबरला पूर्ण करण्यात आले.

सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील

भारत सरकारच्या सूचनेनुसार, कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्वाचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील 15 ते 17 डिसेंबर दरम्यान करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हे, महानगरपालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या महत्वपूर्ण मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयु, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये किती बेड्स उपलब्ध?

  • एकूण आयसोलेशन बेड्स – २३ हजार २९५
  • ऑक्सिजन बेड्स – ३३ हजार ४०४
  • आय.सी.यु. बेड्स – ९ हजार ५२१
  • व्हेंटीलेटर बेड्स – ६ हजार ३
  • एकूण उपलब्ध डॉक्टर – २३ हजार ७०१
  • कोविड संदर्भात प्रशिक्षित डॉक्टर्स – २२ हजार ३३०
  • एकूण उपलब्ध नर्सेस – २५ हजार ५९७
  • एकूण प्रशिक्षित नर्सेस – २२ हजार ३२४
  • एकूण उपलब्ध आरोग्य कर्मचारी – १० हजार २३६
  • एकूण प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी – ९ हजार १०१
  • उपलब्ध आरटीपीसीआर कीट्स – ३ लाख २६ हजार २८०
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.