Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Lockdown Update: उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनविषयी मुख्यमंत्री काय बोलणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी रात्री 8.30 वाजता संवाद साधणार आहेत. Maharashtra Lockdown update

Maharashtra Lockdown Update: उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार, लॉकडाऊनविषयी मुख्यमंत्री काय बोलणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज्यातील जनतेशी संवाद
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 6:08 PM

मुंबई: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या (Maharashtra Lockdown) उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.  उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील. (Maharashtra Lockdown update Chief Minister Uddhav Thackeray address state today on the outbreak of corona)

मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी काय बोलणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीकेंड लॉकडाऊन केल्यानं प्रथमच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये ते वीकेंड लॉकडाऊनला राज्यातील जनतेने दिलेला प्रतिसाद, राज्यातील कोरोना लसीकरण, रक्तदान, सरकारी आणि खासगी कार्यलयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु करणे याबाबत संवाद साधण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या संवादामध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच रविवारी टास्कफोर्स सोबत बैठक घेतली होती. त्याबैठकीत राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा देखील झाली. त्यापूर्वी 8 मार्चला  त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संवाद साधला होता. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ञांनी मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यास नियम काय असू शकतात

  • ब्रेक द चेन हा राज्य सरकारचा लॉक डॉऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री साडेआठ वाजता घोषित करु शकतात.
  • या ब्रेक द चेन लॉकडॉऊनमध्ये केंद्राने लॉकडाऊन लावताना ज्या चुका केल्या, त्या टाळण्याचा प्रयत्न
  • हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असू शकतो, यामध्ये केवळ आपत्कालीन सेवा सुरु राहतील
  • मॉल्स,दुकाने बंद होऊ शकतात पण जीवनावश्यक वस्तूंची दुकानांना परवानगी असू शकते
  • किराणामाल, भाजीपाल्याची दुकानं सुरु राहण्याची शक्यता
  • जिल्हानिहाय बेडची संख्या दोन-तीन दिवसात वाढवण्याची शक्यता
  • जिल्हा पातळीवरच्या सीमा बंद केल्या जाऊ शकतात
  • मुंबई लोकलबद्दल सध्या विचार सुरु आहे

महाविकास आघाडी  सरकारचे मंत्री काय म्हणाले?

अस्लम शेख  काय म्हणाले?

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली (Maharashtra Lockdown guidelines) आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं.

महाराष्ट्रात 12-13 दिवसांचा लॉकडाऊन?

महाराष्ट्रात लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका. तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल. महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याचं आश्वासन देतो, असं मुश्रीफ म्हणाले होते.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

लॅाकडाऊनमध्ये जिल्हाबंदीपासून इतर कडक निर्बंध असतील. लॅाकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी अंमलबजावणी होणार आहे. लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वजेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

संबंधित बातम्या: 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 वाजता जनतेशी साधणार संवाद, मोठ्या घोषणेची शक्यता

औरंगाबादचा विकास वेगाने होणार; मला विकास कामे करण्याची घाई: उद्धव ठाकरे

(Maharashtra Lockdown update Chief Minister Uddhav Thackeray address state today on the outbreak of corona lockdown guidelines sop may announced by cm Mumbai  Pune Nashik Nagpur lockdown guidelines)

"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.