Maharashtra Lockdown update | परभणी, मिरा-भाईंदरसह नागपुरात लॉकडाऊन, पुणे- मुंबईसह राज्याची स्थिती काय?

राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता रुग्णांचा पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. (Maharashtra Lockdown Update)

Maharashtra Lockdown update | परभणी, मिरा-भाईंदरसह नागपुरात लॉकडाऊन, पुणे- मुंबईसह राज्याची स्थिती काय?
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 11:21 AM

मुंबई : महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रात 1 लाख 10 हजार 485 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता रुग्णांचा पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. (Maharashtra Lockdown Update district and city wise lockdown update)

पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कल्याण-डोंबिवली याशिवाय अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन किंवा रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना स्थिती काय? 

राज्यात काल (12 मार्च) 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 82 हजार 191 इतकी झाली आहे. तर राज्यात आज 56 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे.

राज्यात काल 11,344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,17,744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.79% एवढे झाले आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर 

मुंबईत काल (12 मार्च) 1 हजार 646 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 40 हजार 277 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 4 कोरोनाबाधित रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 हजार 519 इतकी झाली आहे.

त्याशिवाय मुंबईत गेल्या 24 तासात 1 हजार 122 कोरोनामुक्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णालयांची संख्या 3 लाख 15 हजार 379 इतकी झाली आहे.

मुंबईतील तीन भागात कोरोनाचा सर्वाधिक धोका

मुंबईच्या तीन भागात सगळ्यात जास्त कोरोनाचा धोका असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील टी वाॅर्ड-मुलुंड, के वेस्ट जुहू, एफ नाॅर्थमधील सायन माटुंगा या ठिकाणी कोरोनाचा जास्त रुग्ण पाहायला मिळत आहे. मुलुंड आणि जुहू या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.

सध्या मुलुंडमध्ये 0.51 टक्के, जुहू परिसरात 0.47 टक्के आणि सायन माटुंगा या ठिकाणी 0.44 टक्क्यांनी कोरोना रुग्ण वाढत आहे.

?कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन? ?

?परभणीत दोन दिवसांचा लॉकडाऊन

परभणी जिल्ह्यात 2 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. रात्री 12 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. परभणीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

?नागपुरात लॉकडाऊन

नागपुराच कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात असणार आहे. यावेळी मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील.

?मीरा भाईंदरमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मीरा भाईंदर मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 मार्चपर्यंत मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन असणार आहे. 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. मीरा भाईंदर क्षेत्रामधील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी हॉटस्पॉट क्षेत्राबाहेर हा नियम लागू नसेल.

हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट क्षेत्राबाहर सर्व हॉटल्स, रेस्टॉरंट, बार, हॉल आणि फूड कोर्ट इत्यादी ठिकाण्याच्या सेवा 50% क्षमतेसह सुर राहतील. तसेच, मॉलसहित सर्व प्रकारची दुकाने रात्री 11.00 वाजेपर्यंतच सुरू राहतील.

?औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन

औरंगाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे औरंगाबादेत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद राहणार आहे. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. गेल्या 11 मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत लॉकडाऊन करण्यात आला आहे. औरंगाबादेतील अंशत लॉकडाऊन हा 11 ते 7 पर्यंत असणार आहे.(Maharashtra Lockdown Update district and city wise lockdown update)

?कोणकोणत्या जिल्ह्यात निर्बंध? ?

?पुण्यात कडक निर्बंध 

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.

?कल्याण-डोंबिवलीत कठोर निर्बंध

कल्याण-डोंबिवली परिसरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातील दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार P-1 आणि P-2 यानुसार दुकाने सुरु ठेवण्यात येतील. खाद्यपदार्थ आणि शीतपेयाच्या गाड्या रात्री 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेनं सुरु राहील.

लग्न आणि हळदी समारंभ सकाळी 7 ते संध्याकाळी 9 या वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसारच करण्यात यावेत. अन्यथा वर-वधू आणि हॉल मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर केडीएमसी परिसरातील बार रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. होम आयसोलेशनमध्ये असणारा रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

?नांदेडमध्ये कडक निर्बंध

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नांदेडमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहे. त्यानुसार येत्या 12 मार्च रात्री 12 वाजल्यापासून ते 21 मार्च पर्यंत जिल्ह्यात रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्व व्यवहार, दुकाने बंद राहतील. औषधी दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे. सर्व कोचिंग क्लासेस ,आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर 15 मार्चपर्यंत लग्नाला 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी आहे. (Maharashtra Lockdown Update district and city wise lockdown update)

लग्न ,राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमाना बंदी आहे. परीक्षा असल्याने शाळा – महाविद्यालय कोविड नियमानुसार सुरू राहणार आहेत. पण 21 मार्चनंतर जर रुग्ण आणखी वाढले तर निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत.

?कोणकोणत्या जिल्ह्यात कर्फ्यू??

?पनवेलमध्ये नाईट कर्फ्यू

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 12 ते 22 मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे. तसेच 22 मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज असेल.

?जळगावात जनता कर्फ्यू 

जळगावात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 12 ते 14 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सोमवारी 15 मार्चपासून सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने आणि मेडिकल्स, शासकीय कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूध विक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, गॅरेज अशा बाबींना या जनता कर्फ्यूत सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत.

जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेतून किराणा माल, भाजीपाला व फळे विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. नागरिकांची बाजारपेठेत होणारी गर्दी रोखून कोरोनाची संपर्क साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

?वाशिममध्ये नाईट कर्फ्यू

वाशिम जिल्ह्यात 8 मार्च ते 15 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यानुसार संध्याकाळी 5 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत 38 तासांची संचारबंदी लागू आहे. याच दरम्यान दूध विक्रेते, डेअरी यांना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर दवाखाने,मेडिकल हे 24 चालू राहणार आहे.

?धुळ्यात जनता कर्फ्यू

धुळे जिल्ह्यात चार दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. रविवारी (14 मार्च) सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवारी (17 मार्च) पहाटे सहा वाजेपर्यंत असा हा जनता कर्फ्यू असेल. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळ्यात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. धुळे जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत.

(Maharashtra Lockdown Update district and city wise lockdown update)

संबंधित बातम्या :

Nagpur Weekend Lockdown | नागपुरात शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन, नंतर 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन

Aurangabad Lockdown | औरंगाबादेत कडकडीत बंद, काय सुरु, काय बंद?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.