Maharashtra lockdown Update : उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार?

राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक बाब आहे. 

Maharashtra lockdown Update : उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार?
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 9:49 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर कडक लॉकडाऊनची घोषणा केलीय. या लॉकडाऊनला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेन असं नाव दिलं आहे. त्यानुसार उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यात पुढील 15 दिवस कलम 144 लागू राहणार आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार, हे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक बाब आहे.  (15-day curfew in the state, what will start and what will be closed in lockdown?)

उद्या संध्याकाळपासून ‘ब्रेक द चेन’

राज्यात 144 कलम लागू पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असतील.

अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद असणार

सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. त्या अत्यावश्यक कामांसाठीच वापरल्या जातील. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या प्रवासासाठी त्या सुरु ठेवण्यात येतील. त्यामध्ये रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरु राहतील.

शक्य असेल तर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा

बांधकाम, अन्य उद्योगांना सांगतो की, तुमच्या साईट्सवर शक्य असेल तर तिथेच तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय करा, त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. तुमच्या कँम्पसमध्ये सुविधा नसतील तर कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचं आवाहन

हॉटेल्स, रेस्टॉरंट्सची होम डिलिव्हरी, टेक अवे सेवा सुरु

हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पुर्वीप्रमाणेच निर्बंध, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरु राहतील.

रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगीय. पण त्यांनीही पार्सल व्यवस्थाच सुरु ठेवावी.

पाणीपुरवठा, शेतीची काम करण्यास मुभा

इलेक्ट्रिक, गॅस पुरवठा, एटीएम सुरु राहतील

घरोघरी वर्तमानपत्रांचं वाटप सुरु राहतील

सिनेमागृह, चित्रिकरण बगीचे, व्यायामशाळा बंद

पंढरपूरमध्ये मतदान संपेपर्यंत निर्बंधांमधून सवलत

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यामुळे आजपासून राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लागू नसतील. मात्र, मतदान पाड पडल्यानंतर या मतदारसंघातही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना फेसबुकवरून आवाहन

15-day curfew in the state, what will start and what will be closed in lockdown?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.