मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरलेत, चौकशीसाठी हजर राहू शकत नाही; परब यांनी मागितली ईडीकडे 14 दिवसांची मुदत

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. (Anil Parab seeks 14 days time to appear before it in connection with a money laundering case)

मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरलेत, चौकशीसाठी हजर राहू शकत नाही; परब यांनी मागितली ईडीकडे 14 दिवसांची मुदत
Anil Parab
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 12:52 PM

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहणार नाही. मला चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरीता 14 दिवसांची मुदत देण्यात यावी, असं अनिल परब  यांनी ईडीला कळवलं आहे. (Anil Parab seeks 14 days time to appear before it in connection with a money laundering case)

अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्यानुसार 11 वाजेच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतला असून ईडीने त्याला मंजुरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

परब यांचं ईडीला पत्रं

परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं आहे. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत. ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला 14 दिवसांचा अवधी देण्यात यावा, असं परब यांनी पत्रात म्हटलं आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे. आता परब यांना वेळ द्यायचा की त्यांना दुसरे समन्स काढायचे यावर ईडीचे अधिकारी विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राऊत यांच्याकडून दुजोरा

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी परब यांना आलेल्या समन्सवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परब यांना ईडीने नोटीस दिली असली तरी परब आज ईडी समोर हजर होणार नाहीत, असं राऊत यांनी सांगितलं. तसेच दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्यावरून मनसेने केलेल्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारने जी मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यामुळे सण-उत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना वाढू नये म्हणून राज्य सरकार काळजी घेत आहे. आम्ही हिंदू विरोधी नाहीत. केंद्राने जे सांगितलं त्यानुसार आम्ही सण, उत्सव संदर्भात निर्णय घेत आहोत, असं ते म्हणाले.

खास अधिकाऱ्याच्या घरावर छापे

परब यांना ईडीची नोटीस आलेली असतानाच परब यांना दुसरा धक्का बसला आहे. परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या आहेत. या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. बजरंग खरमाटे असं या अधिकाऱ्याचे नाव असून ते नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी आहेत. ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

नोटीस आली, कारण गुलदस्त्यात

दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांना नोटीस नेमकी कोणत्या कारणामुळे दिलेली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, याबाबतची माहिती सर्वात आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्यांनी ट्विट करत परब यांना ईडीची नोटीस आली असून आम्ही कायद्याने लढू असं म्हटलं होतं. (Anil Parab seeks 14 days time to appear before it in connection with a money laundering case)

संबंधित बातम्या:

Anil Parab : अनिल परब यांना तिसरा धक्का, आता राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्तांकडून चौकशी

अनिल परब यांना दुसरा धक्का, खास अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचे छापे; संकट वाढणार?

ठाकरे सरकारचे ‘घोटाळा इलेव्हन’, रश्मी ठाकरे ते किशोरी पेडणेकर, किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर

Anil Parab | महाराष्ट्र परिवहन विभागातील कथित घोटाळ्याची चौकशी होणार, अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?

(Anil Parab seeks 14 days time to appear before it in connection with a money laundering case)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.