आम्हीही कामधंदे केले, बोळ्याने दूध पित नव्हतो; भुजबळांचा सोमय्यांवर पलटवार

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (maharashtra minister chhagan bhujbal denied kirit somaiya's allegations)

आम्हीही कामधंदे केले, बोळ्याने दूध पित नव्हतो; भुजबळांचा सोमय्यांवर पलटवार
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 5:13 PM

मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या लहानपणी घेतलेल्या मालमत्तांवर सोमय्या बोलत आहेत. खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्ही 75 वर्षे घरातच बसलो होतो का? आम्ही काय बोळ्याने दूध पित होतो का? आम्ही काही कामधंदा केलाच नाही का?; असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. (maharashtra minister chhagan bhujbal denied kirit somaiya’s allegations)

किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. सोमय्यांच्या सर्व आरोपांचं भुजबळ यांनी आज खंडन केलं. आमच्यावर कारवाई झाली जप्तीही झाली. सर्व बाबतीत हायकोर्ट, सेशन कोर्टात लढत आहोत. वरेमाप आरोप करायचे धंदे सुरू आहेत. अरे आमचं वय 75 आहे. त्यावेळी आम्ही लहान असताना 10 हजार, 15 हजार एकराने घेतलेल्या जागांची आता किमंत वाढली. तुम्ही त्या जमिनीची किंमत आताच्या भावाने सांगता. जणू काही आम्ही 75 वर्षे घरातच बसलो होतो का? आम्ही इतके वर्षे काय बोळ्याने दूध पित होतो का? आम्ही कामधंदा केला नाही केला का? लोकांवर खोटे आरोप करण्याचे तुझ्यासारखे धंदे आम्ही केले नाही. ही मीडिया ट्रायल थांबवली पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

काडीचंही सत्य नाही

आज ते जे काही सांगत आहेत. त्या चार पाच वर्षापूर्वीच्या केसेस आहेत. त्या संदर्भात ईडीने मालमत्ता जप्त केल्या आहेत. आज ते एका जमिनीबाबत बोलले. नाशिकपासून 20 किमी लांब लहानसा रस्ता होता. 1980मध्ये ही जमीन घेतलेली आहे. शिळ्या कढीला उत आणण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकरणी सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केसेस सुरू आहेत. त्यांचा काय हेतू आहे माहीत नाही. त्या केसेसवर प्रभाव टाकण्याचा हेतू आहे का? हे माहीत नाही. याबाबत काय कारवाई करायची त्याबद्दल आम्ही वकिलांना विचारू. हे सर्व जुनं प्रकरण आहे. त्यांच्या हातातच सर्व यंत्रणा आहेत. त्यांनी कारवाई केली. आमचा न्यायलायावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही लढत आहोत. यावर आम्ही अधिक बोलणार नाही. एवढेच सांगेल त्यांनी सर्व आरोपात काडीचंही सत्य नाही, असं ते म्हणाले.

ते आमचं जुनं घर

भुजबळ यांना त्यांच्या सांताक्रुझ येथील इमारतीबाबतही विचारण्यात आलं. त्यावर, ते आमचं जुनं घर आहे. ते पाडून बांधण्यात आलं आहे. 2.5 एफएसआय मिळतो. त्या पुनर्बांधणीच्या स्किममधली ती वास्तू आहे. त्यातील अर्धे गाळे मूळ मालकाला द्यायचे आहेत. तर अर्धे आमच्याकडे राहणार आहेत. कोर्ट कचेऱ्या चालू असल्याने ही प्रक्रिया थांबली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सोमय्यांचे आरोप काय?

दरम्यान, सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर आरोप केले होते. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इथे एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?, ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल करतानाच परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा सोमय्या यांनी केला. तसेच येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (maharashtra minister chhagan bhujbal denied kirit somaiya’s allegations)

संबंधित बातम्या:

मुंबईतील ‘त्या’ नऊ मजली इमारतीशी तुमचा संबंध काय?; किरीट सोमय्यांचा भुजबळांना सवाल

लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा जाहीर दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

Aurangabad Crime: लग्नाच्या ६ व्या दिवशीच नववधू पळाली, पावणे दोन लाख रुपये आणि दागिने घेऊन मध्यस्थीही पसार

(maharashtra minister chhagan bhujbal denied kirit somaiya’s allegations)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.