उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, नवाब मलिकांनी फडणवीसांना डिवचलं, कोणता बॉम्ब फोडणार?

पत्रकार परिषदेला 2 तास बाकी असताना बरोबर आठच्या ठोक्याला मलिकांनी फडणवीसांना इशारा देणारं ट्विट केलं आहे. 'उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है', अशा आशयाचं ट्विट करुन मलिकांनी फडणवीसांना डिवचलं आहे.

उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, नवाब मलिकांनी फडणवीसांना डिवचलं, कोणता बॉम्ब फोडणार?
नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 8:35 AM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंचरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मलिक आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत फडणवीसांवर मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.फडणवीसांचे कोणत्या अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि ते कसे आहेत, याची चिरफाडच करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेला 2 तास बाकी असताना बरोबर आठच्या ठोक्याला त्यांनी फडणवीसांना इशारा देणारं ट्विट केलं आहे. ‘उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है’, अशा आशयाचं ट्विट करुन मलिकांनी फडणवीसांना डिवचलं आहे.

आधी वानखेडे विरुद्ध मलिक, आता मलिक विरुद्ध फडणवीस!

नवाब मलिक यांनी एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्याविरोधात रान पेटवलंय. दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फोडू म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते फडणवीसांनी काल पत्रकार परिषद घेत मलिकांवर गंभीर आरोप केले. अगदी मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनीही अगदी काही वेळात पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप फेटाळून लावले. तसंच उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांचीच पोलखोल करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं. त्यांच्या याच पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

1993 च्या मुंबई बॉम्बब्लास्टमधील आरोपीकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधींची जमीन केवळ 20 लाखांत विकत घेतली, ती कशी? आणि मुंबईकरांच्या चिंधड्या उडवणाऱ्या व्यक्तींशी मलिकांनी व्यवहार केला कसा? असे सवाल कालच्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी उपस्थित केले. तसंच इतरही आणखी 4 व्यवहारात मलिकांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधे असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. अर्ध्या तासाच्या या पत्रकार परिषदेत फडणवीस मलिकांवर तुटून पडले होते. माझ्याकडे मलिकांच्या काळ्या कामांची यादी आहे. मी ही यादी आणि पुरावे संबंधित तपास यंत्रणांना देणार आहे. तसंच माझ्याकडचे पुरावे मी मुख्यमंत्री, शरद पवार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे देणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

सकाळी 10 वाजता मलिकांची पत्रकार परिषद

फडणवीसांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनी ट्विट करुन ‘तयार हूँ, आ रहाँ हूँ’ असं म्हणत आरोपांना उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं साांगितलं. पुढच्या काही वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी केलेले आरोप सॉफ्ट पद्धतीने फेटाळून लावत त्यांचेच अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, हे उद्या सकाळी 10 वाजता उघडे पाडू, असा इशाराच मलिकांनी दिला.

हे ही वाचा :

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी व्यवहार तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का नाही?, फडणवीसांनी 5 शब्दात विषय संपवला

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.