देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या मिनिटाला नवाब मलिकांचं ट्विट, ‘आ रहा हूँ मैं…!’

देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनी दुसऱ्या मिनिटाला ट्विट करुन 'आ रहाँ हूँ मैं', असं म्हणत प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं त्यांनी एकप्रकारे सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या मिनिटाला नवाब मलिकांचं ट्विट, 'आ रहा हूँ मैं...!'
नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 1:41 PM

मुंबई :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या तासाची पत्रकार परिषद नवाब मलिक यांच्यावर आरोपांचे बॉम्बगोळे फेकले. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन अगदी कवडीमोल भावात घेतली. मुंबईच्या चिंधड्या उडवणाऱ्या अंडरवर्ल्ड आरोपींकडून मलिकांनी जमीन कशी काय घेतली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच आणखी 4 व्यवहार देखील मलिकांनी अंडरवर्ल्डशी केलेत, असा खळबजनक दावा त्यांनी केला. फडणवीसांची पत्रकार परिषद संपते ना संपते तोच मलिकांनी दुसऱ्या मिनिटाला ट्विट करुन ‘आ रहाँ हूँ मैं’, असं म्हणत प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं एकप्रकारे सांगितलं.

मलिकांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध, फडणवीसांची अर्ध्या तासाची खळबळजनक पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या तासांची खळबळजनक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक बॉम्ब फोडले. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींकडून मलिकांनी कोट्य़वधींची जमीन फक्त 20 लाखात घेतली. याच्यातून नेमकं काय सूचित होते. तर मलिकांचे जमीन खरेदीचे संबंध थेट अंडरवर्ल्ड

शी होते, मी चौकशी यंत्रणांना याचे पुरावे देणार आहेत. तसंच हे सगळे पुरावे शरद पवार, मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या मिनिटाला नवाब मलिकांचं ट्विट, ‘आ रहा हूँ मैं…!’

फडणवीसांची अर्ध्या तासांची पत्रकार परिषद संपताच मलिकांनी दुसऱ्या मिनिटाला ट्विट करुन आ रहाँ हूँ मै, असं म्हणत फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचं एकप्रकारे सांगितलं आहे. मलिक दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. याच पत्रकार परिषदेत ते फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या प्रत्येक बॉम्बगोळा निकामी करण्याचा प्रयत्न करतील.

देवेंद्र फडणवीसांचे मलिकांवर खळबळजनक आरोप    

“मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. 1993 ला आम्ही मुंबईकरांच्या चिंधड्या उडताना पाहिले, आणि हे ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. ही एकच नाही अशा 5 प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत, ज्यातील 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल आहे. हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार, शिवाय राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहेत, त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

(Maharashtra Minister Nawab Malik Tweet After Devendra fadnvis Press Conference)

हे ही वाचा :

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.