‘अर्थ’साठी भांडत होते, पण अजित दादांनी ‘ही’ खाती देखील पळवली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील काही विद्यमान मंत्र्यांना चांगलेच धक्के दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात उचलबांगडी करण्यात आली आहे. खातेवाटपात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फेरबदलात अजित पवार गटाचा चांगलाच फायदा झालाय.

'अर्थ'साठी भांडत होते, पण अजित दादांनी 'ही' खाती देखील पळवली
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 5:47 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेना शिंदे गटाचा विरोध होता. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा तिढा सुटताना दिसत नव्हता. या तिढ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात सातत्याने बैठका पार पडल्या. वरिष्ठ पातळीवर सारख्या बैठका पार पडल्यानंतरही तोडगा निघत नव्हता.

दोन दिवसांपू्र्वी अजित पवार हे दिल्लीत जावून आले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सातत्याने बैठका पार पडल्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही निवासस्थानी बैठकांच्या जंत्री सुरु होत्या. या सगळ्या घडामोडींनंतर अखेर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. या खातेवाटपात शिंदे गट आणि भाजपच्या काही मंत्र्यांना मोठा फटका बसला आहे. कारण चांगली खाती त्यांच्या हातून निसटली आहेत.

अब्दुल सत्तार यांना मोठा फटका

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा फटका बसला आहे. शेती हे महत्त्वाचं खातं आहे. याशिवाय शेतकरी मंत्री हा राज्यातील शेतकऱ्यांचं विधानसभेत प्रतिनिधित्व करतो, असं मानलं जातं. हा मंत्री शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी असतो. तो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो, चांगले निर्णय घेतो. त्यामुळे कृषीमंत्रीपदाला चांगला मान आहे.

अब्दुल सत्तार यांना वर्षभरापूर्वी सत्तापालट झाली तेव्हा कृषीमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. ही अब्दुल सत्तार यांच्यासाठी पर्वणी होती. पण गेल्या वर्षभरात अब्दुल सत्तार यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. तसेच त्यांच्यावर खोटी धाड टाकण्याचे देखील आरोप झाले. विविध मुद्द्यांवरुन त्यांची कृषीमंत्रीपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्याजवळ असलेलंल कृषी खातं काढून घेतलं आहे. त्यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कृषी विभागाची जबाबदारी ही नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. याआधी महाविकास आघाडीचं सरकार असताना ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री होते.

संजय राठोड यांच्याकडील चांगंल खातं निसटलं, मुख्यमंत्र्यांकडील खातंही राष्ट्रवादीला

विशेष म्हणजे शिंदे गटातील आणखी एका मंत्र्यांना जोरदार धक्का बसला आहे. मंत्री संजय राठोड यांच्याकडे असणारं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी काढण्यात आली आहे. त्यांना आता मृदा आणि जलसंधारण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं होतं. पण हे खातं देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा झटका

या खातेवाटपात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनादेखील फटका बसला आहे. कारण भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असणारं वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य विभागाची जबाबादारी काढण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. हा महाजन यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय.

भाजपला आणखी एक मोठा झटका

या खातेवाटपात भाजपला आणखी एक मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खातं होतं. पण आता हे खातं अजित पवार यांना देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाचा देखील विरोध होता. पण अखेर अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजप मंत्री अतुल सावे यांच्याकडून सहकार खातं काढण्यात आलं आहे. पण तरीही त्यांना गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण सारख्या ताकदवान खात्यांची जबाबदारी मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता नेमकी कोणती खाती?

  • सामान्य प्रशासन
  • नगर विकास
  • माहिती व तंत्रज्ञान
  • माहिती व जनसंपर्क
  • परिवहन
  • सामाजिक न्याय
  • पर्यावरण व वातावरणीय बदल
  • खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणती खाती?

  • गृह
  • विधी व न्याय
  • जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  • ऊर्जा
  • राजशिष्टाचार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणती खाती?

  • वित्त व नियोजन

राज्य मंत्रिमंडळातील इतर 26 मंत्र्यांकडे कोणती खाती?

  • छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
  • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  • सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  • चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
  • गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
  • धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
  • सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
  • संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय रविंद्र सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
  • अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  • दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
  • अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
  • संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  • मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  • अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.