Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाला धक्का, तर कुणाचा दणका? विधान परिषद निवडणुकीचा A टू Z निकाल

MLC Election Result 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत.

कुणाला धक्का, तर कुणाचा दणका? विधान परिषद निवडणुकीचा A टू Z निकाल
विधान परिषद निवडणुकीचा A टू Z निकाल
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 7:23 PM

महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीकडे खो दिला आहे. मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महायुतीने महाविकास आघाडीची मतं पळवली आहेत. त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या मतमोजणीच्या माहितीनुसार, महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे केवळ 3 उमेदवार होते. यापैकी काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा जवळपास विजय निश्चित आहे. ते विजयापासून केवळ 1 मताने मागे आहेत. या निवडणुकीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसताना दिसत आहेत. त्यांना 12 मते मिळाली आहेत. तरीही निकाल अजून पूर्णपणे येणे बाकी आहे. थोड्याच वेळात कदाचित अधिकृतपणे संपूर्ण निकालाची माहिती समोर येणार आहे.

अजित पवारांनी काँग्रेसची 5 मते फोडली

या निवडणुकीत काँग्रेसचे 5 मते फुटल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाकडे 42 मतं होती. पण अजित पवार गटाला 47 मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसची 5 मतं फोडण्यात अजित पवार गटाला यश मिळालं आहे. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होती. याशिवाय काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. आपल्या पक्षाचे तीन-चार मतं फुटतील, असं कैलास गोरंट्याल उघडपणे म्हणाले होते.

निवडणुकीत काय-काय घडलं?

या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने 1 उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली होती. महायुतीकडे असणारी मते पाहता त्यांची 8 उमेदवार सहज जिंकून येणार होते. पण त्यांनी 9 वा उमेदवार दिल्याने या निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी 1 उमेदवार दिला होता. महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता त्यांचे तीनही उमेदवार सहज जिंकून येऊ शकले असते. पण या निवडणुकीत महायुतीने मविआला धक्का दिला.

महायुतीने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन दिवसांपासून मोठी तयारी केली होती. तीनही पक्षांनी आपापले आमदार मुंबईतल्या वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवली होती. या हॉटेलमध्ये निवडणुकीच्या आधीच्या दिवशी प्रचंड खलबंत झाली. अखेर महायुतीच्या घटकपक्षांचे हे प्रयत्न यशस्वी ठरताना दिसले. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.

भाजपचे विजयी उमेदवार –

  • 1) पंकजा मुंडे – 26 मतं
  • 2) परिणय फुके – 23 मतं
  • 3) सदाभाऊ खोत – 26 मतं
  • 4) अमित गोरखे – 23 मतं
  • 5) योगेश टिळेकर – 23 मतं

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार

  • 1) शिवाजीराव गर्जे – 23 मतं
  • 2) राजेश विटेकर – 24 मतं

शिवसेना विजयी उमेदवार

  • 1) कृपाल तुमाने – 25 मतं
  • 2) भावना गवळी –  24 मतं

काँग्रेसच्या विजयी उमेदवार

  • 1) प्रज्ञा सातव – 25 मतं

शिवसेना ठाकरे गट (विजयी घोषित होणं बाकी)

  • 1) मिलिंद नार्वेकर – 22 मतं

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार (निकाल येणं बाकी)

1) जयंत पाटील (शेकाप) – 12 मतं

विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.