मुंबई : मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra) परिसरात एका इमारतीचा भाग (building collapsed) कोसळला आहे. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai Bandra Razak Building collapsed Live Update)
मध्यरात्री दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात चार मजली रझाक चाळ आहे. काल (रविवारी 6 जून) रात्री 2 च्या सुमारास या 4 मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
रेस्क्यू ऑपरेशन सुरु
सद्यस्थितीत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित आहेत.
Maharashtra | One died, four persons injured after part of a building collapsed in the Bandra area of Mumbai. The injured have been admitted to a hospital. Officials of fire and police department present at the spot, says Congress MLA Zeeshan Siddique pic.twitter.com/F0Q0vB7GCr
— ANI (@ANI) June 7, 2021
(Mumbai Bandra Razak Building collapsed Live Update)
संबंधित बातम्या :
सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई; अवघ्या 15 दिवसात पालिकेकडून काम पूर्ण
मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण