Maharashtra Mumbai Rains IMD Alert LIVE | मुंबईत मुसळधार पाऊस, शळांना सुट्टी जाहीर
Maharashtra Mumbai Rains IMD Alert LIVE | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवली, वसई. विरार शहरांमध्ये आज दुपारपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय.
मुंबई | 26 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या प्रचंड पाऊस पडतोय. पावसाचा वेग वाढला आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पालघर आणि राजगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यभरातील मुसळधार पावसाच्या सविस्तर बातमी आम्ही तुम्हा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
पालघर जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट
पालघर :
पालघर जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वसई-विरारमधील उद्या सर्व शाळा सुरू राहणार आहेत.
-
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालाय. जिल्ह्यातील दक्षिण भाग असलेल्या अहेरी भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंच्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालीय.
-
-
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग
इचलकरंजी :
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. कृष्णा आणि पंचगंगा पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवून पाण्याचा विसर्ग केला.
-
भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी
भंडारा :
– आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज रात्री पुन्हा एकदा भंडाऱ्यात जोरदार हजेरी लावली.
– नागरीक उकाळ्यामुळं हैराण झाले होते. सकाळपासून प्रखर उष्णतेचे चटके बसत असताना रात्रीच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
– पावसाअभावी भात पिकाची लागवड खोळंबल्यानं चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
-
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या शाळांना सुट्टी जाहीर
मुसळधार :
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांना उद्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अतिमुसळधार पावसात स्कूल बस चालवणार नाही, असं शाळा आणि पालकांना स्कूल बस असोसिएशनने हा निर्णय कळवला आहे.
-
-
चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उद्यासाठी (27 जुलै) शाळा- महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालीय. आपत्कालीन परिस्थिती आणि अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
-
पुढचे 48 तास महत्त्वाचे, पुणे हवामान खात्याचा अंदाज
– कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट,
– या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता,
– मराठवाड्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
– पुणे हवामान खात्याचा अंदाज
-
गडचिरोली जिल्ह्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर कोसळली वीज
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पाऊसाची शक्यता होती. विजेच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान महागाव येथील शेतकरी शेतात काम करीत असताना वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके (वय 54 वर्ष, राहणार महागाव) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
-
वर्धा जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू
वर्धा :
समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. दुर्गा ज्ञानेश्वर जांभुळे राहणार आर्वी असं मृत महिलेच नाव आहे. पाच महिलांना विजेची आस लागली. विजेची आस लागलेल्या महिलांवर गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.. शेतातील काम आटोपून घरी परत जात असताना ही घटना घडली.
-
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या दरम्यान वीज पडून चार वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच मृत्यू
चंद्रपूर :
ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर सिंदेवाही तालुक्यातील शेतात रोवणीचे काम करणाऱ्या कल्पना प्रकाशझोडे आणि श्रीमती परसोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके या 25 वर्षीय शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला. तर चौथ्या घटनेत गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झालाय. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट पावसाचा जारी केलाय तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.
-
मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्टव जारी
मुंबई :
“बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे”, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलीय.
हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यातील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
26/7: बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता pl kp watch on hevy rainfall alerts in state in next 5 days;Mumbai,Thane Raigad Rtn,ghat areas of Pune, Satara & more https://t.co/XVjLG7bduz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 26, 2023
-
चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी
चंद्रपूर :
चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी
सकाळपासून शहरातील आकाशात ढगांचा लपंडाव सुरू होता.
विजांचे नर्तन आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला पाऊस.
जोरदार पावसाने रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.
पूर्ण जून महिना अल्पवृष्टीचा गेल्यानंतर जुलैच्या मध्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी धास्तावला आहे.
-
अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद
मुंबई :
मुंबई उपनगरमध्ये सध्या परत एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे.
आज दुपारी मुसळधार पावसानंतर अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला होता.
सध्या अंधेरीसह मुंबई उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
या मुसळधार पावसाचा परिणाम अंधेरी सबवेवर दिसत आहे.
सध्या अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
भुयारी मार्गासह आजूबाजूच्या परिसरातही पाणी भरू लागले आहे, पाण्याचा प्रवाह किती वेगवान आहे, हे येथील रस्त्यावर दिसून येत आहे.
पालिकेचे कर्मचारी पंपिंग मशिनद्वारे पाणी काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
भुयारी मार्गापासून रस्त्यापर्यंत पाणी साचले आहे. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी भुयारी मार्गात दररोज पाणी तुंबल्याने लोक नाराज आहेत.
सध्या, जोपर्यंत पाऊस कमी होत नाही आणि भुयारी मार्गातून पाणी वाहून जात नाही, तोपर्यंत हा भुयारी मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
सध्या अंधेरी सबवेच्या दिशेने येणाऱ्यांसाठी ही सूचना आहे की, जर तुम्हाला अंधेरी सबवेच्या दिशेने यायचे असेल तर येऊ नका, कारण अंधेरी सबवे आता बंद आहे, तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकू शकता.
-
वसई-विरारमध्ये पावसाचा जोर वाढला, नागरिकांमध्ये पुन्हा पूर परिस्थितीची भीती
वसई :
वसई-विरारमध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे
जोरदार पडणाऱ्या पावसाने सकल भागात पुन्हा पाणी साचायला सुरवात झाली आहे.
मागच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचे दोन दिवसांपूर्वी पाणी ओसारले आहे
मात्र पुन्हा एकदा पाऊस जोरदार पडायला सुरुवात झाल्याने पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे
-
नवी मुंबईकरांची पाणी चिंता मिटली
नवी मुंबई :
नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. एप्रिल 2024 पर्यंत पुरेल इतका पाणी साठा जमा झालाय.
मोरबे डॅममध्ये अधिकचा पाणी साठा तयार झालाय.
यावर्षी पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईकरांची चिंता मिटली आहे.
मोरबे धरणात 30 दिवसात 2082 मिलिमिटर पावसाची नोंद झालीय.
यामुळे आठवड्यातून 1 दिवस विभागवर संध्याकाळची पाणी कपात तात्काळ कमी केली जाणार आहे.
-
साताऱ्याला रेड अलर्ट, NDRF ची टीम दाखल
सातारा :
पाटण, कराड तालुक्यातील संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम कराडमध्ये दाखल झालीय.
सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा सज्ज झालीय.
संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर NDRF ची टीम सर्व सामुग्री, यंत्रणेसह कराडमध्ये दाखल झाली आहे.
सध्या कुठलाही धोका नसूनही या टीमकडून पुरग्रस्त गावे, दरड प्रणव क्षेत्रातील ठिकाणची पाहणी केली जाणार आहे.
-
मुंबईत मुसळधार पाऊस, वसई-विरारमध्ये कोसळधार सुरु
मुंबई :
मुंबईत आज दुपासपासून मुसळधार पाऊस
चाकरमान्यांच्या घरी जाण्याच्याच वेळेला पावसाचा जोर जास्त
सध्या तरी लोकल ट्रेनची वाहतूक सुरुळीत सुरु
Published On - Jul 26,2023 6:28 PM