“राज ठाकरे कोणत्याही विषयाचा फडशा पाडतात”; बाळा नांदगावकर यांनी एकाच वाक्यात नेत्याचं मोठेपण सांगितलं

राज ठाकरे यांच्याकडे जर जुन्या पक्षाची धुरा असती तर आज राज्यातील शिवसेनेचे चित्र वेगळे असते असा टोला बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. राज ठाकरे यांच्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून ते अगदी नवाब मलिक यांच्यापर्यंत त्यांनी टीका केली.

राज ठाकरे कोणत्याही विषयाचा फडशा पाडतात; बाळा नांदगावकर यांनी एकाच वाक्यात नेत्याचं मोठेपण सांगितलं
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 8:13 PM

मुंबई : राज्यात गुढीपाडव्याची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आजच्या सभेकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. त्यामुळे राज ठाकरे आज आपली तोफ कुणावर डागणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याआधी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना शिवसेनेचा उल्लेख केला नसला तरी जुन्या पक्षाची धुरा राज ठाकरे यांच्याकडे दिली असती तर आज शिवसेनेचे राज्यात वेगळे चित्र असते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांनी ते फेल गेल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 वर्षाचा प्रवास सांगताना बाळा नांदगावकर यांनी युतीच्या प्रश्नावरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, जुन्या पक्षाची म्हणजेच शिवसेनेची धुरा जर राज ठाकरे यांच्याकडे दिली असती तर राज्यात काय घडलं असतं आणि आजच शिवसेनेचं चित्रही वेगळं असतं असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

यावेळी बाळा नांदगावकर यांनी बोलताना राज ठाकरे हे अत्यंत प्रामाणिकपणे, अभ्यासपूर्ण मांडणी करूनच ते कोणत्याही विषयाचा ते फडशा पाडतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना आता दुर्देवाने इतर लोकं चालतात मात्र राज ठाकरे चालत नाहीत असं नाव न घेता त्यांनी त्यांना टोला लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये पाठवणारे, टी बाळू बोलणारे, टीपू सुलतानाचे तळी उचलणारे, अस्लम शेख, नसीम खानसारखी माणसं,दाऊदशी संबंध असलेले नबाब मलिक, कौन बाळासाहेब असं विचारणारे कोणीही यांना चालतात मात्र राज ठाकरे चालत नाहीत अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या काळातील शिवसेनेवर केली आहे.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना तुम्ही काय प्रगती केली. तुमच्या काळात नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि 40 आमदार आणि 13 खासदार तुम्हाला सोडून गेले आहेत. त्यामुळे तुमचं नेतृत्व निष्फळ ठरलेलं असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.