Mumbai Rain Update : ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, मुंबईत धुवाँधार पाऊस

मुंबईतील दादर, शिवाजी पार्क परिसरात पहिल्यांदा पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यानंतर मुंबईतील विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, पवई परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे सध्या तरी कोणत्याही भागात पाणी साचल्याची किंवा वाहतूककोंडीची बातमी समोर आलेली नाही.

Mumbai Rain Update : ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, मुंबईत धुवाँधार पाऊस
मुंबईत धुवाँधार पाऊस
Follow us
| Updated on: Jun 09, 2024 | 10:44 PM

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पावसाने एन्ट्री मारली आहे. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. तर दादर, करी रोड, परळ या भागात धुवाँधार पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे मुंबईसह आज सोलापूर आणि पुण्याला आजच्या पावसाने चांगलंच झोडपलं आहे. सध्यातरी कोणत्याही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती समोर आलेली नाही. पण पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खरंतर मुंबई, ठाणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी दिवसा पाऊसही पडला. मुंबईत संध्याकाळनंतर मान्सून दाखल झाला. जोरदार पाऊस पडला. पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईकरांची उकाड्याने सुटका झाली आहे.

मुंबईतील दादर, शिवाजी पार्क परिसरात पहिल्यांदा पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तसेच मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्याने मुंबईकर आनंदात आहेत. मुंबईकर पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ शिवाजी पार्क परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यानंतर मुंबईतील विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, पवई परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला.

सोलापुरात जोरदार पाऊस

विशेष म्हणजे सोलापूर शहरासह जिल्ह्यातही आज संध्याकाळी तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून मुक्तता झाली असली तरी शेतकरी मात्र अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

पुणे आणि वाशिममध्ये पाऊस

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी लावली. अर्धा तास जोरदार पावसाच्या हजेरीनंतर रिमझिम पाऊस सुरूच आहे. आजदेखील पाऊस झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. वाशिमच्या वाशिम, मालेगाव, कारंजा, मंगरूळपिर, शिरपूर मध्ये जोरदार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मुक्ताईनगरातही जोरदार पाऊस पडला.

सांगलीत चार दिवसांपासून पाऊस

सांगली जिल्ह्यात गेले चार दिवस झाले पाऊस पडत आहे. जिल्ह्यात ठीकठिकाणी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कृष्णा नदी पाणी पातळी वाढल्याने सांगलीकर सुखावले आहेत. सांगलीवाडी बंधाऱ्यांवरून पाणी पडू लागले आहे. तर या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.