Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करुन सोडणाऱ्या अवकाळी पावसाने आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शरहांमध्ये बरसला. त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला.

Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 6:12 PM

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करुन सोडणाऱ्या अवकाळी पावसाने आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. खरंतर या पावसाला अनेक मुंबईकर पहिला पाऊस मानत असतील. पण हा पहिला पाऊस नाही. या पावसाला ग्रामीण भागात वाळवीचा पाऊस म्हणता. तर मराठी भाषेत सर्वसाधारणपणे अवकाळी पाऊस म्हणतात. या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला. हा पाऊस एकटा आलेला नाही. सोबत वादळही घेऊन आलाय. 40 ते 50 किमी प्रतीतास अशा वेगाने वाहणारे वारे सोबत घेऊन आलाय. तसेच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह धुमाकूळ घेऊन आलाय. प्रचंड वारा आणि सोबत पावसाच्या सरी आल्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांमध्ये बरसला. त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला. हा पाऊस इतक्या वेगाने आला की त्याने अवघ्या अर्ध्या तासात मुंबईसह, पालघर आणि नवी मुंबईच्या परिसराला व्यापून टाकलं. मुंबईत तर चांगलाच पाऊस पडला.

राज्यातील शेतकऱ्यांचंं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असलं तरी मुंबईत आणि लगतच्या इतर शहरांमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये दुपारच्या वेळी भयंकर ऊन पडत होतं. सूर्य जणू आगच ओकतोय, अशी परिस्थिती होती. त्यामुळे नागरीक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते हे सत्य आहे. अखेर पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईत आलेला पाऊस सोबत वेगवाने वाऱ्यासह धुळीचं वातावरणही घेऊन आला.

प्रचंड धुळीचं साम्राज्य

अनेक ठिकाणी पाऊस आणि वारा तर आहेच पण धुळीचं प्रचंड साम्राज्य बघायला मिळत आहे. धुळीमुळे काही ठिकाणी दृष्यमानता कमी झाल्याचं चित्र आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागात सकाळी चांगलं वातावरण होतं. सूर्यदेखील आग ओकत होता. पण दुपारी तीन वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला. अचानक ढग दाटून आले, वातावरणात काळोत पसरला. वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेसह अचानक पावसाला सुरुवात झाली. यावेळी अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य बघायला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.