राज्य महिला आयोग अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक, पोलीस महासंचालकांना कारवाई करण्याची सूचना

राज्य महिला आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी कारवाईची मागणी केलीय.

राज्य महिला आयोग अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक, पोलीस महासंचालकांना कारवाई करण्याची सूचना
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 7:18 PM

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तर प्रचंड संतापले आहेत. त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याच्या काचा फोडल्या. तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या राहत्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. त्यांनी सत्तारांना फोन करत समज दिली. तसेच माफी मागण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य महिला आयोगाला देखील या प्रकरणाची दखल घ्यावी लागली.

राज्य महिला आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी कारवाईची मागणी केलीय. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना महिला आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सत्तारांच्या वादग्रस्त विधानावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

हे सुद्धा वाचा

“राज्य महिला आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालकांना पत्र पाठवत या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ महिला आयोगाकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

“ही सत्तेची मस्ती आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अशाप्रकारचे वक्तव्य करणं गैर आहे. या प्रकारचे वक्तव्य ज्या लोकांकडून करण्यात येतील, त्यावर कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाकडून दिल्या जातील”, असं देखील त्या म्हणाल्या.

“अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे अपमानास्पद वक्तव्य केलंय त्याचा जाहीरपणे निषेध करते. या वक्तव्यानंतर राज्यभरातून अनेक तक्रारी महिला आयोगाला प्राप्त झाल्या आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

“महिलांना कमी लेखणं, अपमानास्पद वागणूक देणं, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणं, कर्तृत्व हनन करणं याची दखल महिला आयोगाने घेतली आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे”, अशी भूमिका चाकणकर यांनी मांडली.

“खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांचे असे विचार असतील तर राज्यातील सर्वसामान्य महिलांबद्दल त्यांना काय वाटत असेल याबद्दल विचार न केलेलाच बरा”, असंदेखील रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....