Section 144 Imposed in Mumbai : ओमिक्रॉनचा धसका, मोर्चे, आंदोलन, रॅलीला मनाई; मुंबईत कलम 144 लागू

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन वेरिएंटचे (Omicron Variant ) रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) कलम 144 लागू (Section 144 CrPC imposed ) करण्यात आलं आहे.

Section 144 Imposed in Mumbai : ओमिक्रॉनचा धसका, मोर्चे, आंदोलन, रॅलीला मनाई;  मुंबईत कलम  144 लागू
ओमिक्रॉन
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 9:42 AM

मुंबई: महाराष्ट्रातील ओमिक्रॉन वेरिएंटचे (Omicron Variant ) रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) कलम 144 लागू (Section 144 CrPC imposed ) करण्यात आलं आहे. मुंबईत काल ओमिक्रॉनचे 3 रुग्ण सापडले आहेत आणि पिंपरी चिचंवडमध्ये 4 नव्यानं रुग्ण आढळले. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुंळं त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. अखेर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता घेण्यासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

उद्या मध्यरात्रीपर्यंत 144 लागू

ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही आंदोलनाला परवानगी देण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत तिघांना लागण

मुंबईत आढलेल्या तिन्ही रुग्णांपैकी एक 48 वर्षीय रुग्ण टांझानिया येथून 4 डिसेंबर रोजी आला होता. 4 डिसेंबर रोजी त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील दोघांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.

दुसरा रुग्ण 25 वर्षीय व्यक्ती आहे. तो लंडन येथून 1 डिसेंबर रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी बाधीत आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.

तिसरा व्यक्ती 37 वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) आहे. तो दक्षिण आफ्रिका येथून 4 डिसेंबर रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आले.

इतर बातम्या:

VIDEO: आरोग्य खात्याच्या परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा सीबीआयकडे जाऊ; गोपीचंद पडळकरांचा इशारा

Omicron : मुंबईची धडधड वाढली, धारावीत एकजण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह!

Maharashtra Section 144 imposed in Mumbai on 11th and 12th December in wake of Omicron cases Rallies morchas processions prohibited

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.