बदलापूर घटनेच्या विरोधात राज्यात आक्रोश सुरु आहे. राज्यभरातील जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. आता विरोधकाही एकटवले आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यात विरोधकांनी २४ ऑगस्ट रोजी बंद पुकारला आहे. हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत पाळावा, त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात यावी, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात जी अस्वस्थता आहे, त्या विषयावरुन हा बंद पुकारला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनी स्वंयस्फुर्तीने हा बंद पाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद आहे. पालकांना असे वाटते की मुलगी शाळेत सुरक्षित राहील का? कार्यालये असतील, रुग्णालये असतील तिथे आपण सुरक्षित राहू का? असे माता भगिनींना वाटत आहे. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे. आम्ही विरोधी आहोत. विकृतीच्या विरोधात आम्ही बंद पुकारत आहोत. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल. सर्व नागरिकांचा बंद असेल. जात पात धर्माचा भेद नसेल. या बंदमध्ये पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा.
यंत्रणावेळेत हल्ली नसती तर उद्रेक झाला नसता. राजकारणाने प्रेरित हा बंद असल्याचं काही लोक म्हणत आहे. परंतु राज्यातील या प्रकरणाची दखल उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली आहे. मग न्यायालयाने घेतलेली दखल ही राजकारणाने प्रेरित आहे का? न्यायालयाने राज्य सरकारला थोबड फोडले आहे. ते थोबडणेही राजकारणाने प्रेरित आहे का?. जर उच्च न्यायालय स्वत:हून दखल घेत असेल तर मी म्हणेन उत्स्फूर्तपणे विचारत असेल तर जनतेलाही विचारता येईल.
जनतेचे न्यायालय वेगळे आहे. जनतेचा दरवाजा उघडत आहे. यंत्रणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी हा दरवाजा उघडत आहे. त्यासाठीच हा उद्याचा बंद आहे. उद्याच्या बंदचे यश अपयश राजकारणात मोजायचे नाही. बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती विरुद्ध असेल. त्यामुळे त्याचे यश अपयश हे विकृती विरुद्ध संस्कृती असा असणार आहे.