मोठी बातमी ! MPSC परीक्षेसाठी लोकलने प्रवास करण्यास मुभा, ओळखपत्र दाखवणं गरजेचं, परिपत्रक जारी

4 तारखेला होणाऱ्या एमपीएससी गट ब परीक्षेसाठी सरकारने लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे. परीक्षेसाठी लोकलमधून प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना त्यांचं परीक्षेचं ओळखपत्र दावखावं लागणार आहे.

मोठी बातमी ! MPSC परीक्षेसाठी लोकलने प्रवास करण्यास मुभा, ओळखपत्र दाखवणं गरजेचं, परिपत्रक जारी
MPSC LOCAL TRAIN
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 11:50 PM

मुंबई : येत्या 4 सप्टेंबर रोजी एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्रवास सुखकर व्हावा म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससी गट ब परीक्षेसाठी परीक्षार्थींनी इप्सित स्थळी वेळेत पोहोचावं म्हणून सरकारने लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे. परीक्षेसाठी लोकलमधून प्रवास करायचा असल्यास त्यासाठी परीक्षेचं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. सरकारने याबाबत परिपत्रक काढलं आहे. (maharashtra state government allows students to travel through local train for MPSC exam)

विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा द्या, राज्याचं रेल्वे विभागाला पत्र

दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 येत्या 4 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा जाहीर झाल्याने राज्यातील तरुणांना शासकीय सेवेत दाखल होण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. मात्र, सध्याच्या कोरोना साथीमुळे विद्यार्थांना प्रवासासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने याबाबत रेल्वे विभागाला पत्र लिहलं होतं. या पत्रात विद्यार्थांना प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी सरकारने रेल्वे विभागाला केली होती. सरकारच्या या मागणीला रेल्वे विभागाने आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

परीक्षेचं ओळखपत्र दाखवावं लागणार

रेल्वे विभागाच्या परवानगीनंतर आता दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 साठी विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यासाठी एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. ओळखपत्र दाखवल्यानंतर विद्यार्थांना परीक्षेसाठी लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

इतर पदांच्या भरतीलाही राज्य शासनाची मान्यता 

दरम्यान, ‘दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020’ पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 11 एप्रिल 2021 रोजी होणार होती. कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलावी लागली होती. ती परीक्षा आता 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. ‘एमपीएससी’च्या इतरही पदांच्या भरतीलाही राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचा शासननिर्णय 30 जुलै रोजीच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून भरण्यात येणार आहेत.

इतर बातम्या :

संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देणारे हवालदार गायब, जालना पोलिसात खळबळ

अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट! चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी

Maratha Reservation : राष्ट्रपतींना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नाही, निवेदनावर सही करणं भाजप खासदारानं टाळलं!

(maharashtra state government allows students to travel through local train for MPSC exam)

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.