धुमसत्या मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले, विद्यार्थ्यांसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; फडणवीस यांनी थेट…

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर सरकारशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चाही केली आहे.

धुमसत्या मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले, विद्यार्थ्यांसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले; फडणवीस यांनी थेट...
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 11:56 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे हिंसा भडकली आहे. ही हिंसा अजूनही धुमसत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये संचारबंदी लागू केली होती. त्यात आता थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. तसेच मदतीचं आवाहन केलं. शरद पवार यांनीही राज्य सरकारसमोर मणिपूरमधील व्यथा मांडताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले. त्यांनीही या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाच मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांठी राज्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मणिपूरच्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं. शरद पवार यांनी आज बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मणिपूर येथील एनआयटी शैक्षणिक संस्थेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्याबाबत विनंती करण्यासाठी सांगली येथील एक कुटुंब आले होते. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला विद्यार्थी सुखरूप येतील असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

सरकारशी संपर्क साधणार

मणिपूर येथील एनआयटी या शैक्षणिक संस्थेत अजूनही काही विद्यार्थी अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे पालक मला आज भेटले. याविषयी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना राज्यात सुखरूप आणण्याबाबत लक्ष घालावे, असं माझं सरकारला आवाहन आहे. मी थोड्यावेळापूर्वी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. पण संपर्क झाला नाही. पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधणार आहे, असं पवार म्हणाले.

काळजी करू नका, फडणवीसांचा फोन

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये तणावाची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला आहेत. ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली. मणिपूरमध्ये तणाव असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. तसेच या विद्यार्थायांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. काळजी करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. सर्व काही ठिक होईल, असं फडणवीस या विद्यार्थ्यांना म्हणाले.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालक यांना संपर्क केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ मणिपूर सरकारशी संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना येथे संरक्षण मिळणार आहे. शिवाय या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारकडून तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्र प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.