महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंच्या पाठीमागे लागलंय का? पत्नी क्रांती रेडकरचं बेधडक उत्तर
आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक आरोपांची राळ उडवून देत आहेत. मलिकांच्या आरोपांना आज क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : “एनसीबीचे विभागीय संचालक तथा माझे पती समीर वानखेडे यांच्याविरोधात एक पूर्ण यंत्रणा काम करते आहे. पण मला विश्वास आहे की आरोप करणाऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. ते खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत. मागील 15 वर्षांचा रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर एकही आरोप नाही. अनेकांना त्यांच्या कामाचा त्रास होतोय. ज्यांना त्रास होतोय तीच लोकं समीर यांच्या पाठीमागे लागली आहेत”, असं समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या.
नवाब मलिकांच्या आरोपांना क्रांती रेडकरचं उत्तर
आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक आरोपांची राळ उडवून देत आहेत. मलिकांच्या आरोपांना आज क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
एक यंत्रणा समीरविरोधात काम करतीय, पण महाराष्ट्र सरकार…
विविध प्रश्नांना उत्तर देत असलेल्या क्रांतीला यावेळी पत्रकारांनी ‘महाराष्ट्र सरकार समीर वानखेडे यांच्याविरोधात काम करतंय का?’ असा थेट प्रश्न विचारला. यावेळी क्रांतीने बेधडक उत्तर दिलं. ती म्हणाली, “होय त्यांच्याविरोधात एक विशेष यंत्रणा काम करतीय. पण मला खात्री आहे महाराष्ट्र सरकार खूप समजदार आहे. महाराष्ट्र सरकार सहकार्य करणारं आहे. विजय सत्याचाच होईल, असं काम महाराष्ट्र सरकार करेल. राज्य सरकार जरुर समीर वानखेडे यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभा राहिल ज्यावेळी त्यांना सत्य कळेल”
भाजपच्या सांगण्यानुसार वानखेडे कारवाई करतात?, क्रांतीचं थेट उत्तर
भाजपच्या सांगण्यानुसार समीर वानखेडे कारवाई करतात, त्यानुसार त्यांच्या कारवाईची दिशा ठरते, असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला जातोय. या प्रश्नाला उत्तर देताना क्रांती रेडकर म्हणाली, “या आरोपात कोणतंही तथ्य नाही. ते कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत. ते खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत.”
पुढे बोलताना क्रांती म्हणाली, “राहिला प्रश्न बॉलिवूड कलाकारांवर कारवाई करण्याचा तर समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत, ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. उरलेले ड्रग्ज पेडलर आणि त्यासंबंधी आहेत. त्यामुळे जे आरोप करतायत त्यांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही”
सारखं सारखं बोलणार नाही, ही माझी शेवटची पीसी
सगळीकडून आरोपांची राळ उडाली असताना मी आता फार बोलणार नाही. मी कंटाळली आहे. विजय सत्याचाच होईल. ही माझी यासंदर्भातील शेवटची पत्रकार परिषदल असेल. शेवटी मीडिया ट्रायल नको. माननीय कोर्टात आरोप सिद्ध झाले तर जी काय कारवाई व्हायची ती होईल, असंही क्रांती म्हणाली.
हे ही वाचा :
जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या येत आहेत, आमच्या जीवाला धोका; क्रांती रेडकरचा दावा