जुलैच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई ऑक्टोबरमध्ये जाहीर, पुणे विभागाला सर्वाधिक मदत
राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई:राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.तरी सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत
अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जावून पाहणी करून तेथील शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या.या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला असून पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
असे होणार अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे वाटप
कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97लाख, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.
इतर बातम्या:
Upcoming IPO: शेअर मार्केटमध्ये 25 दिवसांमध्ये 12 IPO येणार, कंपन्याचा 20 हजार कोटी उभारण्याचा मानस
Maharashtra Uddhav Thackeray Government declared 365 crore rupees package for compensation to farmers heavy rainfall in July information given by Vijay Wadettiwar